शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद

By admin | Updated: July 17, 2015 03:07 IST

दिल्लीत बसून इंटरनेटच्या माध्यमातून देशभरातील अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला अटक करण्यात जरीपटका पोलिसांनी यश मिळवले.

देशभरातील अनेकांना गंडा : कोट्यवधींची फसवणूक नागपूर : दिल्लीत बसून इंटरनेटच्या माध्यमातून देशभरातील अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला अटक करण्यात जरीपटका पोलिसांनी यश मिळवले. लैसराम हेमंतासिंह वय ३०, बिसनपूर, मणिपूर), थाउदम चिंगलेनशना सिंह (वय २२, रा. इम्फाल मणिपूर), नितिन युमनाम सिंह (वय २४, रा. कोटला मुबारकपूर, दिल्ली), नगांगबाम अमरजीतसिंह, संडे माइकल मदूबुईके (वय ३३) आणि केनेथ ओकाका (वय ३७, रा. सफदरजंग, दिल्ली) अशी या टोळीतील आरोपींची नावे आहेत. सेकंड शादी डॉट कॉमच्या माध्यमातून एका वैज्ञानिक महिलेस डॉ. मोहनसिंग नामक लंडनमधील डॉक्टरने लग्नाची मागणी घातली होती. लग्नानंतर त्याने या महिलेला नागपुरात स्थायिक होण्याचीही बतावणी केली होती. महिलेने त्याच्यावर विश्वास टाकला. त्यानंतर ३० जूनला कथित मोहनसिंगने महिलेला फोन करून आपण लंडनहून भारतात यायला निघाल्याचे सांगितले. आपल्याकडे ८ लाख, ५० हजार डॉलर असल्याचीही बतावणी त्याने केली. दुसऱ्या दिवशी त्याने दिल्ली विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी पकडल्याचे सांगून कस्टम ड्युटी भरण्यासाठी ३ लाख ९ हजार रुपये भरले, तरच आपली मुक्तता होईल, अशी बतावणी केली. महिलेचा विश्वास बसावा म्हणून अर्चना सिंग नामक एका बोगस महिला कस्टम अधिकाऱ्याशीही त्याने बोलणी करून दिली. त्यावर विश्वास करून महिलेने ३ लाख ९ हजार रुपये जमा केले. यानंतर आरोपीने तिला पुन्हा २७ लाख रुपये जमा करण्यास सांगितले. त्यामुळे महिलेला संशय आला. तिने दिल्ली विमानतळावर संपर्क साधला असता असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पीडित महिलेने जरीपटका पोलिसांकडे तक्रार नोंदवली. ठाणेदार दीपक खोब्रागडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुन्हेशाखेच्या सायबर सेलची मदत घेत आरोपींच्या मोबाईल तसेच लॅपटॉपचे कॉल डिटेल्स आणि लोकेशन तसेच बँक खात्याची माहिती मिळवली. त्यावरून हे आरोपी दिल्लीत बसूनच देशभरातील नागरिकांना गंडवित असल्याचे उघड झाले. त्यामुळे गुन्हेशाखा आणि जरीपटका पोलिसांचे पथक सोमवारी दिल्लीकडे रवाना झाले. बुधवारी उपरोक्त आरोपींना जेरबंद केल्यानंतर गुरुवारी सकाळी हे पथक आरोपींसह नागपुरात पोहचले. (प्रतिनिधी)२४ पासबुक, ६५ एटीएम कार्ड या टोळीकडून पोलिसांनी विविध बँकांमधील खात्याची २४ पासबुक आणि ६५ एटीएम कार्ड जप्त केले. ही टोळी विदेशात नोकरी लावण्याची, मोठी लॉटरी लागल्याची बतावणी करून आमिष दाखवते. आॅनलाईन रक्कम भरायला लावून बँकेच्या खात्याची माहिती मिळवते आणि आॅनलाईन रक्कम काढून घेते. अशा प्रकारे या टोळीने देशातील अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. त्यांच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी जरीपटक्याचे ठाणेदार दीपक खोब्रागडे, पीआय बी. पी. सावंत आणि एपीआय के. डी. वाघ तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी बजावली.