शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

ब्रोकर पुरुषोत्तम रेड्डी यांनाही अंतरिम दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:09 IST

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणामधील आरोपी दाम्पत्य राजेंद्र व नीता ...

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणामधील आरोपी दाम्पत्य राजेंद्र व नीता गांधी यांच्यानंतर ब्रोकर पुरुषोत्तम रेड्डी यांनाही अंतरिम दिलासा दिला. प्रकरणाचा तपास सुरू ठेवा, पण पुढील आदेशापर्यंत रेड्डी यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करू नका, असे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले. तसेच, रेड्डी यांच्या याचिकेवर चार आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले.

रेड्डी यांनी स्वत:विरुद्धचा एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या प्रकरणातील ११ आरोपींविरुद्ध अमरावती येथील कोतवाली पोलिसांनी १५ जून २०२१ रोजी भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२०-ब अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. बँकेच्या काही आरोपी अधिकाऱ्यांनी इतर आरोपींसोबत संगनमत करून बँकेची रक्कम दलालांमार्फत रोख्यांमध्ये गुंतवली. त्यामुळे दलालांना ३ कोटी २९ लाख २३ हजार ३१९ रुपये दलाली द्यावी लागली. परिणामी, बँकेचे आर्थिक नुकसान झाले. बँकेने संबंधित रक्कम थेट गुंतवली असती तर, या रकमेची बचत झाली असती. तसेच, हा व्यवहार करताना रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकांचे उल्लंघन करण्यात आले व बँकेच्या बनावट स्टॅम्पचा उपयोग करण्यात आला, अशी पोलीस तक्रार आहे. रेड्डीतर्फे ॲड. परवेझ मिर्झा यांनी कामकाज पाहिले.