शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

मधुमेहावर पं.दीनदयाल अभियानाचे इन्सुलीन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:00 IST

पेट्रोलने जनसामान्यांचे ‘ब्लड प्रेशर’ वाढले आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या झळा सोसणारा मनुष्य मधुमेहाने (ब्लड शुगर) त्रस्त आहे.

ठळक मुद्देसरकार करणार प्रबोधन : आयुर्वेदिय चिकित्सा पद्धतीचे मिळणार डोज

जितेंद्र ढवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोलने जनसामान्यांचे ‘ब्लड प्रेशर’ वाढले आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या झळा सोसणारा मनुष्य मधुमेहाने (ब्लड शुगर) त्रस्त आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सरकारने राज्यात ‘पं.दीनदयाल आयुष मधुमेह जागृती अभियान’ राबविण्याचा संकल्प केला आहे. पहिल्या टप्यात सहा जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे.मधुमेह रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सातत्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यातील जनतेस मधुमेहाची कारणे आणि लक्षणे यांच्या अभ्यासासहित विविध अवस्थांचे निदान करून आयुर्वेदिय चिकित्सा पद्धतीचे महत्त्व या अभियानातून पटवून दिले जाणार आहे.राज्यात २ ते १० आॅक्टोबर दरम्यान धुळे, रायगड, कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि अकोला या सहा जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येईल. यात मधुमेहाची शंका असलेल्या रुग्णांची तपासणी आणि रक्ताचे नमुने घेतले जाईल. या अभियानात वरील सहा जिल्ह्यातील प्रत्येक आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी महाविद्यालयात मधुमेह तपासणी कक्ष स्थापन करण्यात येतील.अधिकाधिक नागरिकांना या अभियानाची माहिती व्हावी यासाठी आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक तसेच सरपंच व स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यांच्यामार्फत जिल्हास्तरावर जनजागृती अभियान राबविण्यात येईल. शहरी भागात आरोग्य केंद्रात मधुमेह तपासणी कक्ष स्थापन करण्यात येतील.नियोजनासाठी तीन समित्या‘पं.दीनदयाल आयुष मधुमेह जागृती अभियाना’चे नियोजन करण्यासाठी तीन समित्या असतील. यात राज्यस्तरावरील समितीचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील. यात एकूण १२ सदस्य राहतील. जिल्हास्तरावर पालकमंत्री समितीचे मुख्य समन्वयक आणि अध्यक्ष राहतील. यात १४ सदस्य राहतील. तालुकास्तरावर नगराध्यक्षांच्या अध्यक्षेतसात सदस्यीय टीम या अभियानाची अंमलबजावणी करेल. राज्य ते तालुकास्तरावरील समित्यामध्ये वैद्यकीय शिक्षण, आरोग्य विभाग आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असेल, असे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे उपसचिव सुरेंद्र चानकर यांनी एका आदेशाद्वारे स्पष्ट केले आहे.