शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जगातील तरुण बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित

By admin | Updated: October 21, 2015 03:21 IST

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आता सातासमुद्रापलिकडे पोहोचले आहेत.

जपानचा अकिरो करतोय भारतीय इतिहासाचा अभ्यासनागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आता सातासमुद्रापलिकडे पोहोचले आहेत. जगातील तरुणांनाही बाबासाहेबांनी भुरळ घातली आहे. तथागत गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान हे डॉ. आंबेडकरांच्या दृष्टीने समजून घेण्यासाठी जगातील तरुणांचा ओढा भारताकडे वाढला आहे, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जपान येथील अकिरो नाकामुरा होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित होऊन जपान येथील काही विद्यार्थी भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी भारतात आले आहेत. त्यात अकिरोचाही समावेश आहे. बिहार येथील नालंदा विद्यापीठात त्यांनी भारतीय इतिहास आणि पुरातत्त्व विज्ञान या विषयात ते एमए करीत आहेत. विशेष म्हणजे अकिरोसह १५ विद्यार्थी बुद्धकालीन भारत समजून घेण्यासाठी सध्या नागपुरात आले आहेत. ते मनसर येथील बुद्धकालीन अवशेषांचा अभ्यास करीत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचे मार्गदर्शन मिळत आहे. अकिरो हा भदंत ससाई यांच्यासोबतच राहत आहे. दीक्षाभूमीवर दर्शनासाठी तो आला असता त्याच्याशी भेट झाली तेव्हा त्याने याबाबत माहिती दिली. त्याने सांगितले की, भारत हा तथागत गौतम बुद्धांचा देश असल्याने भारताबद्दल आम्हाला नेहमीच आदर राहिला आहे. भारतातील प्राचीन इतिहास हा बुद्धाचाच आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास करण्याचा मी निर्णय घेतला. यावरच मला पुढे पीएचडी करायची आहे. तथागत गौतम बुद्धांप्रमाणेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे सुद्धा जपानमधील लोक सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. तथागत गौतम बुद्धांचे खरे तत्त्वज्ञान समजून घ्यायचे असेल तर ते डॉ. आंबेडकरांच्या दृष्टीनेच समजून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही बाबासाहेबांचाही अभ्यास करीत आहोत. सध्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याची तयारी सुरूअसल्याने या संपूर्ण सोहळ्यामुळे मी पार भारावून गेलो असल्याचेही अकिरो याने सांगितले. (प्रतिनिधी)