शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मिहान-सेझमध्ये इन्फोसिसचे कार्यान्वयन एप्रिलमध्ये होणार

By admin | Updated: February 4, 2017 02:41 IST

मिहान-सेझमध्ये आयटी क्षेत्रातील आघाडीच्या इन्फोसिस कंपनीने पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण केले आहे.

पतंजलीचा लीज करार दोन दिवसांत : एचसीएलचे बांधकाम सुरू नागपूर : मिहान-सेझमध्ये आयटी क्षेत्रातील आघाडीच्या इन्फोसिस कंपनीने पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण केले आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटकरिता एप्रिलपर्यंत २५० जणांची भरती करण्यात येणार असून सध्या १०० जणांची भरती केली आहे. २५ फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. कंपनीने विकास आयुक्ताकडे सॉफ्टवेअर निर्यातीच्या मंजुरीसाठी कर्ज केल्याची माहिती आहे. मिहान-सेझमध्ये टीसीएसनंतर काम सुरू करणारी इन्फोसिस ही दुसरी कंपनी आहे. कंपनीने १४२ एकर जागा घेतली आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) बैठकीत दबाव आणल्यानंतर कंपनीने काम सुरू केले होते. प्रारंभी २५० अभियंत्यांना घेऊन कंपनी काम सुरू करणार आहे. त्यानंतर पुन्हा भरती करणार असल्याची माहिती आहे. कंपनीचे भूमिपूजन करताना कंपनीने १४ हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा दावा केला होता. पहिल्या टप्प्यात ४ हजार जणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. पण तीन वर्षांनंतर कंपनीचे कार्य सुरू करताना प्रारंभी केवळ २५० सॉफ्वेअर अभियंत्यांना रोजगार मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.(प्रतिनिधी) पतंजलीचे काम लवकरच पतंजलीने अविकसित फूड पार्कमध्ये ६९ कोटींच्या गुंतवणुकीतून २३४ एकर जागा तसेच विशेष आर्थिक क्षेत्रात (सेझ) ७४ कोटींच्या गुंतवणुकीतून १०६ एकर जागा विकत घेतली आहे. या जागांचा लीज करार दोन ते तीन दिवसांत होणार आहे. त्यानंतर कंपनी बांधकाम सुरू करण्याची शक्यता आहे. कंपनी एक हजार कोटींच्या गुंतवणुकीतून सर्वात मोठा हर्बल पार्क बनविणार आहे. या पार्कमध्ये लागणारा कच्चा माल विदर्भातील शेतकऱ्यांकडून विकत घेणार आहे. त्याचा फायदा विदर्भातील जवळपास ५० हजार शेतकऱ्यांना होईल, शिवाय मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच कंपनीतर्फे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एचसीएलचे काम सुरू एचसीएल कंपनीने सेझमध्ये ५० एकरवर बांधकाम सुरू केले आहे. कंपनीने पूर्वी १०४ एकर जागेची मागणी केली होती. या कंपनीत रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहे.