शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

माहिती आयोगाचा वन विभागाला दणका

By admin | Updated: November 26, 2015 03:13 IST

राज्यातील वाघांच्या गणना प्रक्रियेची माहिती न देणे वनविभागाला महागात पडले आहे. माहिती अधिकारांतर्गत मागितलेली ..

माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन : तक्रारकर्त्याला दोन हजारांची भरपाई देण्याचे आदेशयोगेश पांडे नागपूरराज्यातील वाघांच्या गणना प्रक्रियेची माहिती न देणे वनविभागाला महागात पडले आहे. माहिती अधिकारांतर्गत मागितलेली माहिती न दिल्याचा ठपका ठेवत राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाने वनविभागावर ताशेरे ओढले आहे. सोबतच तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल दोन हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती देणे शासकीय कार्यालयांना बंधनकारक आहे. नागपुरातील अविनाश प्रभुणे यांनी २०११ ते २०१४ या कालावधीत राज्यातील वाघांच्या गणनेसंदर्भातील प्रक्रियेबाबत वनविभागाकडे माहितीच्या अधिकारात विचारणा केली होती. परंतु जनमाहिती अधिकाऱ्याकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी २८ जून २०१४ रोजी विभागीय वन अधिकाऱ्यांकडे पहिले अपील दाखल केले. या अपिलावर ४५ दिवसांत निर्णय घेणे आवश्यक असतानादेखील अपिलीय अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली नाही. अखेर प्रभुणे यांनी १३ सप्टेंबर २०१४ रोजी राज्य माहिती आयोगाकडे दुसरे अपिल केले. या अपिलावर राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाने १३ फेब्रुवारी २०१५ रोजी सुनावणी केली व विभागीय वन अधिकारी (सर्वेक्षण व नियंत्रण) यांना ३० दिवसांच्या आत सुनावणी घेऊन योग्य निर्देश जारी करण्याचा आदेश दिला.परंतु यावर विभागीय वन अधिकाऱ्यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. अविनाश प्रभुणे यांनी माहिती अधिकाराच्या कलम १८ अंतर्गत राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाकडे तक्रार दाखल केली. यावर खंडपीठाने दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्या व एकूण पुरावे लक्षात घेता प्रभुणे यांची बाजू ग्राह्य धरत तक्रार अर्ज मंजूर केला. खंडपीठाने वनविभागाचे जनमाहिती अधिकारी तसेच प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा निर्वाळा दिला. प्रभुणे यांच्या अपिलावर सुनावणी घ्यावी व त्यांना हवी असलेली माहिती १५ दिवसांच्या आत देण्यात यावी. तसेच त्यांना झालेल्या मानसिक व आर्थिक त्रासासाठी दोन हजार रुपयांची भरपाई देण्यात यावी असे निर्देश दिले.