शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

संक्रमित मातेकडून गर्भालासुद्धा हाेते काेराेनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:11 IST

सुमेध वाघमारे/निशांत वानखेडे नागपूर : संक्रमित मातेपासून गर्भाला काेणताही संसर्ग हाेऊ शकत नाही, कारण त्यांना जाेडणारा ‘प्लॅसेंटा’ संसर्ग राेखण्यासाठी ...

सुमेध वाघमारे/निशांत वानखेडे

नागपूर : संक्रमित मातेपासून गर्भाला काेणताही संसर्ग हाेऊ शकत नाही, कारण त्यांना जाेडणारा ‘प्लॅसेंटा’ संसर्ग राेखण्यासाठी मजबूत भिंत म्हणून काम करताे. मात्र काेराेनाने हा विश्वास चुकीचा ठरविला. काेराेना संक्रमित मातेकडून तिच्या अर्भकालाही बाधा हाेते. भारतीय संशाेधकांच्या अभ्यासातून हे तथ्य समाेर आले आहे. गंभीर लक्षणे असलेल्या मातांकडून जन्मलेल्यांपैकी ६ टक्के मुले काेराेना पाॅझिटिव्ह आढळून आली.

डाॅ. राहुल गजभिये यांनी सांगितले, काेराेनाची पहिली लाट आल्यानंतर गर्भवती महिलांवरील प्रभावासाठी एप्रिल २०२० पासून अभ्यास सुरू करण्यात आला. राज्यातील १८ वैद्यकीय महाविद्यालये व नायर हाॅस्पिटल अशा १९ सेंटरमध्ये संक्रमित गराेदर महिलांची नाेंदणी करण्यात आली. दुसरी लाट आल्यानंतर जुलै २०२१ पर्यंत ६,५०० गर्भवती महिलांची यादरम्यान नाेंद करण्यात आली व त्यांच्यावर व बालकांवर काेराेनामुळे झालेल्या विविध प्रकारच्या प्रभावांचा अभ्यास करण्यात आला.

यादरम्यान मातेच्या संक्रमणाचे तिच्या गर्भावर आणि बाळावर काही परिणाम हाेतात का, याचाही अभ्यास करण्यात येत आहे. एप्रिल २०२० ते जुलै २०२१ या काळात ५२४ बालकांचा अभ्यास करण्यात आला. यातील ६ टक्के बाळांमध्ये जन्मत:च काेराेनाची लक्षणे आढळून आली. विशेष म्हणजे यातील बहुतेक मुले गंभीर लक्षणे असलेल्या मातांकडून जन्मलेली हाेती. ५२४ पैकी १३ बालकांचा मृत्यू झाला हाेता, ज्यापैकी ९ टक्के बाळांना काेराेनाचे संक्रमण झाले हाेते. धक्कादायक म्हणजे गर्भात असताना मातेच्या प्लॅसेंटामध्येसुद्धा काेराेना विषाणूचे संक्रमण आढळून आल्याचे डाॅ. गजभिये यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्लॅसेंटामधूनही काेराेनाचे संक्रमण हाेऊ शकते, पण ही बाधा गर्भधारणेनंतर अल्पावधीत (अर्ली स्टेज) म्हणजे प्लॅसेंटा मजबूत हाेण्याआधीच गर्भाला संक्रमण हाेण्याची शक्यता अधिक असल्याचेही डाॅ. राहुल गजभिये यांनी स्पष्ट केले.

२०२० मध्ये नागपूर विभागात १९९९ स्टीलबर्थ

काेराेनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान गर्भातच बाळ दगावल्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले हाेते. २०१९ मध्ये १६०९ तर २०२० मध्ये १९९९ बाळांनी जन्मत:च (स्टीलबर्थ) प्राण गमावला. यात नागपूर सर्वाधिक ५६७, चंद्रपूरला ४४१ तर गडचिराेलीत ३९७ बाळ दगावले हाेते. मातेकडून काेराेनाचे संक्रमण झाल्याचा अंदाज हाेता, पण आता एनआयआरआरएचच्या निष्कर्षामुळे हा अंदाज खरा ठरला आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अंतर्गत राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य संशाेधन संस्था(एनआयआरआरएच) आणि नायर हॉस्पिटल मुंबईने जर्नल ऑफ ट्रॉपिकल पेडिऍट्रिक्समध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनातून हे निष्कर्ष समाेर आले आहेत. एनआयआरआरएचच्या माजी संचालिका डाॅ. स्मिता महाले यांच्या आयसीएमआर-एनआयआरआरएच, मुंबई, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज व नायर रुग्णालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेग-काेविड रजिट्री’ ची स्थापना एप्रिल २०२० मध्ये झाली. प्रेग -काेविड रजिस्ट्रीचे प्रमुख संशोधक डाॅ. राहुल गजभिये असून डाॅ. राकेश वाघमारे हे १८ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आणि डाॅ. नीरज महाजन या नायर रुग्णलाय मुंबईच्या स्टडी साईट्सचे प्रमुख संशोधक आहेत. नवजात बालकांवरील परिणामाचा अभ्यास नायर रुग्णालयात डाॅ. सुषमा मलिक, डाॅ. सुचित्रा सुर्वे, आणि डाॅ. राहुल गजभिये यांच्या टीमने नुकताच प्रसिद्ध केला.