शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

वाडीत अपघातांचे वाढले प्रमाण

By admin | Updated: August 14, 2016 02:53 IST

वाडीच्या मुख्य रस्त्यावर स्ट्रीटलाईट नसल्याने गेल्या काही दिवसांपासून अपघातात वाढ होत आहे.

मुख्य रस्त्यावर स्ट्रीटलाईटचा अभाव : उपाययोजनेची गरज, पालिका म्हणते, जबाबदारी दुसऱ्यांची सुरेश फलके वाडी वाडीच्या मुख्य रस्त्यावर स्ट्रीटलाईट नसल्याने गेल्या काही दिवसांपासून अपघातात वाढ होत आहे. आधी रस्त्याच्या एका कडेला असणारे स्ट्रीटलाईटही सद्यस्थितीत बंद आहे. त्यामुळे रस्ता ओलांडणाऱ्यांची फजिती होते. त्यातच अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच गुरुवारी रात्री पुन्हा एका अपघाताची भर पडली. त्यामुळे बंद असलेले स्ट्रीटलाईट सुरू करावे, रस्त्याच्या कडेला असणारे स्ट्रीटलाईट रस्ता दुभाजकावर लावावे, अशी मागणी केली जात आहे. आठवडाभरात स्ट्रीटलाईटची समस्या दूर न केल्यास आंदोलन करू, असा इशाराही दिला आहे. सध्या स्ट्रीटलाईटच्या अभावामुळे वाडी नगर परिषद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वाडी नाका ते दत्तवाडी (डिफेन्स गेट) या मुख्य रस्त्यावरच स्ट्रीटलाईटचा अभाव आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. बरेच अपघात हे किरकोळ असल्याने त्याची दखल घेतली जात नाही. कुणी पोलिसांच्या भानगडीत पडण्याच्या मोहातही पडत नाही. त्यामुळे अशा अनेक अपघाताची नोंद वाडी पोलीस ठाण्यात होत नाही. असे असले तरी किरकोळ अपघातांची संख्या वाढतच चालली आहे. स्ट्रीटलाईटच्या अभावामुळेच हे अपघात वाढत चालले आहे. या रस्त्यावर वाडी नाका ते पेट्रोलपंप येथे रात्रीच्या वेळी अपघाताची संख्या अधिक असून गुरुवारी रात्री झालेला गंभीर अपघात त्याचे ताजे उदाहरण आहे. या रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबांवरील लाईट हे केवळ देखाव्यासाठी आहे. बहुतांश लाईटस् हे बंदस्थितीत आहे. त्यातच हे लाईटस् रस्त्याच्या एकाच कडेला असल्याने रस्त्याच्या अर्ध्या भागापर्यंतही त्याचा प्रकाश पोहोचू शकत नाही. अशात दुसऱ्या बाजूने चारचाकी किंवा जड वाहन आल्यास, त्याच्या हेडलाईटस्मुळे डोळे दीपले जाऊन समोरील काहीच दिसत नाही. रस्ता क्रॉस करणारे वाहनाचे हेडलाईट सुरू असल्यास किमान समोर वाहन असल्याचा अंदाज बांधता येतो. मात्र पादचारी रस्ता ओलांडत असेल तर समोरचे काहीच न दिसल्याने अपघात होतो. दिवसेंदिवस वाडी नाका ते दत्तवाडी या एक किमीच्या अंतरामध्ये अशा अपघातांची संख्या वाढत चालली आहे. कॅम्पस् ते दत्तवाडीपर्यंत काळोख केवळ वाडी नाका ते दत्तवाडीपर्यंतचे स्ट्रीटलाईट बंद आहे, असे नाही. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पसपासून पुढे तीन किमीपर्यंत रात्रीच्या वेळी रस्त्यावर अंधार असतो. यापैकी दोन चौकात हायमास्ट लाईट लावण्यात आले आहे. तेवढा एक दिलासा वाहनधारकांना मिळतो. कॅम्पसपासून वाडी नाक्यापर्यंत ये - जा करणाऱ्या रस्त्याच्या मध्ये दुभाजक आहे. त्यामुळे पादचारी मध्येच येण्याची शक्यता कमीच असते. मात्र वाडी नाका दत्तवाडीपर्यंत दुभाजक असले तरी ते नावासाठीच आहे. काही ठिकाणी रेलिंग आहे. मात्र कंट्रोलवाडी ते खडगाव रोडपर्यंतच्या मार्गावरील रेलिंग तुटलेले आहे. त्यामुळे पादचारी कुठूनही रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असतो. अशात रात्रीच्या वेळी वाहनधारकांना काहीच न दिसल्याने अपघात वाढतात. हे थांबण्यासाठी रस्त्याच्या मधोमध, रस्ता दुभाजकावरच असलेल्या खांबावर लाईट लावावे. त्याचा प्रकाश रस्त्याच्या दोन्ही बाजूला पडून अपघातावर नियंत्रण मिळविले जाऊ शकते. यासाठी मात्र नगर परिषदेने पुढाकार घेणे गरजेचे आहे. रस्ता हस्तांतरित व्हावा नागपूर - अमरावती राष्ट्रीय महामार्गावर वाडी नगर परिषदेची हद्द नाका क्र. १० पासून डिफेन्स गेट क्र. २ पर्यंत आहे. हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडे आहे. नादुरुस्त रस्ता, स्ट्रीटलाईटचा अभाव या समस्येविषयी प्राधिकरणाकडे पत्र देऊन स्मस्याचे निराकरण करण्याची विनंती करण्यात आली होती. तसेच आ. समीर मेघे यांनीही शिफारस केली होती. असे असले तरी प्राधिकरणाने ना हरकत प्रमाणपत्र दिल्यास किंवा वाडी नगर परिषदेच्या हद्दीत येणारा रस्ता नगर परिषदेला हस्तांतरित केल्यास नगर परिषद निश्चितच जबाबदारी पार पाडले. त्यामुळे अशा समस्यासुद्धा उद्भवणार नाही. - राजेश भगत, मुख्याधिकारी, नगर परिषद वाडी. पथदिव्यांअभावी अपघात वाढले वाडी नगरपरिषदेच्या हद्दीतून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ जातो. त्या रस्त्याच्या विकासाची कामे ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे आहे. तर दुरुस्तीचे काम हे अटलांटा कंपनीकडे आहे. मात्र या मार्गावर कुठेही पथदिवे लावलेले नाहीत. त्यामुळे अनेकदा अपघात झाले. याबाबत प्राधिकरणाशी पत्रव्यवहार केला. मात्र उपाययोजना करण्यात आली नाही. नगर परिषदेतून जाणारा हा रस्ता नगर परिषदेकडे हस्तांतरित केल्यास त्यावर तोडगा निघू शकतो. पथदिवे लावले जाऊ शकतात. - प्रतीक्षा पाटील, नगराध्यक्ष, नगर परिषद वाडी.