शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

काँक्रिट डेव्हलपर्सवर आयकर कारवाई सुरूच

By admin | Updated: December 4, 2015 03:16 IST

आयकर विभागाने काँक्रिट समूहावर १ डिसेंबरला टाकलेल्या धाडीत आतापर्यंत ३५ लाख रोख आणि १ किलो सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

कार्यालयांची तपासणी : कोट्यवधींच्या व्यवहाराची कागदपत्रे जप्तनागपूर : आयकर विभागाने काँक्रिट समूहावर १ डिसेंबरला टाकलेल्या धाडीत आतापर्यंत ३५ लाख रोख आणि १ किलो सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वात मोठ्या समूहाकडून आतापर्यंत जप्त केलेली रक्कम आणि दागिने अत्यल्प असून धाडीची कारवाई पूर्ण झाल्यानंतरच खरी बाब पुढे येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. काँक्रिट समूहाच्या दोन कंपन्यांची कार्यालये आणि निवासस्थानावर आयकर विभागाचे ५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी १ डिसेंबरला धाडी टाकल्या होत्या. संजय एन. पैडलवार आणि नीलेश रामचंद्र चोरडिया अशी कंपनीच्या व्यवस्थापकीय भागीदारांची नावे आहेत. रोख रक्कम आणि दागिने संजय पैडलवार यांच्या घरून जप्त केली. दोन्ही भागीदारांची घराची तपासणी पूर्ण झाली असून समूहाच्या रामदासपेठ आणि गांधीनगर येथील कार्यालयात धाडीची कारवाई सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. समूहाच्या भागीदारांनी खरे उत्पन्न दडवून ठेवल्याचे अधिकाऱ्यांना सापडलेल्या कागदपत्रांवरून उघड झाले आहे. याशिवाय समूहाने अनेक ग्राहकांकडून घेतलेल्या रोख रकमेची खात्यात नोंद केलेली नाही. तसेच रजिस्ट्री रेडिरेकनर दरापेक्षा कमी दरात केल्याने कलम ५० सी चे उल्लंघन केल्याचे दिसून आले. अधिकारी सर्व कागदपत्रांची कसून तपासणी करीत आहे. दडवून ठेवलेले उत्पन्न आणि दागिन्यांचा खरा आकडा लवकरच बाहेर येईल, असे सूत्रांनी सांगितले. हा समूह १९९४ पासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. नागपुरातील मोक्याच्या ठिकाणी आणि महाराष्ट्राच्या काही भागात ७० प्रकल्प पूर्ण केले आहेत. याशिवाय नागपूर आणि अन्य शहरात रिटेल शॉपिंग सेंटर्स, आॅफिस बिल्डिंंग, इंडस्ट्रीयल बिल्डिंग, अपार्टमेंट प्रकल्प, निवासी फ्लॅट योजना उभारल्या आहेत. (प्रतिनिधी)