प्राध्यापकाची कार पोटविली : काँग्रेस व बसपाची कारवाईची मागणी नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात गुन्हेगार प्रवृत्तीच्या भाजपा पदाधिकऱ्याने एका दलित प्राध्यापकाच्या घरी पोलिसांच्या उपस्थितीत हल्ला केला. ही घटना सरकारला काळे फासणारी आहे. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. काही दिवसांपूर्वी प्रा. मस्के यांच्या घरी गुंडांनी तोडफोड करीत मारहाण केली. फिर्यादी ठाण्यात पोहचल्यावर भाजपा कार्यकर्ता तक्रारीच्या विरुद्ध निदर्शने करीत दबाव टाकतात. मीडियाच्या मध्यस्तीमुळे गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आरोपीला अटक करण्यात आली नाही. याप्रकरणी न्याय व्हावा, गुन्हेगारावर कारवाई व्हावी, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात पोहोचले. प्रदेश प्रवक्ते सागर डबरासे, संघटन सचिव उत्तम शेवडे, जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर, पृथ्वीराज शेंडे, विवेक हाडके आदींनी पोलीस निरीक्षकांशी चर्चा करीत आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)
सरकारला काळे फासणारी घटना
By admin | Updated: September 26, 2015 03:04 IST