शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकारी अभियंत्याला अवैधपणे सक्तीची निवृत्ती

By admin | Updated: June 9, 2017 02:35 IST

पाटबंधारे विभागात कार्यरत कार्यकारी अभियंत्याला शासनाने अवैधपणे सक्तीची सेवानिवृत्ती घ्यायला लावली.

शासनाचा गलथानपणा : व्याजासह थकीत वेतन देण्याचा मॅटचा आदेशलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाटबंधारे विभागात कार्यरत कार्यकारी अभियंत्याला शासनाने अवैधपणे सक्तीची सेवानिवृत्ती घ्यायला लावली. त्यानंतर शासनाने स्वत:ची चूक मान्य केली. परंतु शासनाच्या गलथान कारभारामुळे संबंधित कार्यकारी अभियंत्याला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. या प्रकरणात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणच्या नागपूर खंडपीठाने शासनाला दणका तर कार्यकारी अभियंत्याला दिलासा दिला आहे.विजय चिंचोळकर असे कार्यकारी अभियंत्याचे नाव असून, ते अमरावतीत कार्यरत होते. सेवा समाधानकारक नसल्याचे कारणावरून त्यांना १३ एप्रिल २००५ रोजी सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आली. त्या आदेशाला चिंचोळकर यांनी न्यायाधिकरणात आव्हान दिले होते. ते प्रकरण प्रलंबित असताना शासनाने चिंचोळकर यांना अवैधपणे सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आल्याचे १० फेब्रुवारी २०१६ रोजी घोषित केले. तसेच सक्तीच्या सेवानिवृत्तीचा आदेश रद्द करून चिंचोळकर हे ३१ आॅगस्ट २००८ पर्यंत सेवेत असल्याचे मानल्या जाईल व त्यांना संपूर्ण वेतन दिले जाईल, असा नवीन आदेश जारी केला. या लढ्यात झालेल्या मानसिक त्रासामुळे चिंचोळकर यांनी शासनाच्या आदेशावर समाधान मानले नाही. त्यांनी याचिका दुरुस्त करून थकीत वेतन व अन्य आर्थिक लाभावर व्याज आणि मानसिक छळासाठी भरपाई देण्याची मागणी केली. न्यायाधिकरणने त्यांची मागणी मंजूर केली आहे. ३१ आॅगस्ट २००८ ते संबंधित रक्कम चिंचोळकर यांना मिळतपर्यंतच्या कालावधीत नियमानुसार व्याज आणि चिंचोळकर यांना मानसिक छळासाठी १० हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश न्यायाधिकरणने शासनाला दिला आहे. चिंचोळकर यांच्यातर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली.