शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

इफ्रा खान ‘जेईई-मेन्स’मध्ये अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:09 IST

नागपूर : ‘आयआयटी’सह देशातील महत्त्वाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘जेईई-मेन्स’च्या फेब्रुवारी महिन्याच्या परीक्षेचा निकाल लागला. अनेक विद्यार्थ्यांनी मार्चच्या ...

नागपूर : ‘आयआयटी’सह देशातील महत्त्वाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘जेईई-मेन्स’च्या फेब्रुवारी महिन्याच्या परीक्षेचा निकाल लागला. अनेक विद्यार्थ्यांनी मार्चच्या तिसऱ्या संधीसाठी तयारी सुरू केली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार इफ्रा खान हिने ९९.९९ पर्सेंटाईल ‘स्कोअर’ प्राप्त करत उपराजधानीतून अव्वल स्थान पटकाविले आहे. शहरातील ५० हून अधिक विद्यार्थ्यांचा ‘स्कोअर’ हा ९९ पर्सेंटाईलहून अधिक आहे.

ऋषभसिंह गहरवारने ९९.९७ पर्सेंटाईलचा ‘स्कोअर’ मिळविला. तर यश कवाडे (९९.९५ पर्सेंटाईल), आयुष श्रीवास्तव (९९.९३ पर्सेंटाईल) पार्थ कस्तुरे (९९.९१ पर्सेंटाईल), मुकेश भोजवानी (९९.९० पर्सेंटाईल) यांनी देखील यश मिळविले.

‘एनटीए’तर्फे १६ ते १८ मार्चदरम्यान परीक्षा घेण्यात आली होती. ‘कोरोना’चा प्रकोप अद्यापही कायम असल्याने ‘ऑनलाईन’ माध्यमातून ही परीक्षा झाली. नागपूर तसेच विदर्भातील विविध महाविद्यालयांतून ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नागपुरातून ‘जेईई-मेन्स’ दिली.

आणखी दोन संधी बाकी

९५ हून अधिक पर्सेंटाईलचा ‘स्कोअर’ असूनदेखील विद्यार्थी आणखी नव्या जोमाने पुढील परीक्षा देण्यासाठी तयारी करत आहेत. नव्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या चार प्रयत्नांपैकी ही दुसरी परीक्षा होती. आता आणखी दोन प्रयत्न विद्यार्थी देऊ शकतात. यानंतर २७ ते ३० एप्रिल आणि २४ ते २८ मे या काळात परीक्षा देण्याच्या चार संधी मिळणार आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांनी एप्रिलच्या टप्प्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.