शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पावसात मोबाईलवर बोलाल तर...

By admin | Updated: June 11, 2017 01:56 IST

विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असेल तर मोबाईल, टेलिफोनचा उपयोग अजिबात करू नका.

ही सवय ठरू शकते जीवघेणी : घरात व बाहेरही विजांपासून सावधान लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असेल तर मोबाईल, टेलिफोनचा उपयोग अजिबात करू नका. आकाशात कडाडणारी वीज मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला इजा पोहचवू शकते. पावसाळ्यात तर अशी वीज जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे मोबाईलवर बोलणे टाळण्यासोबतच इंटरनेट सेवाही बंद करून ठेवणे आवश्यक आहे. पावसाळ्यात विजांचा कडकडाट ही नित्याचीच बाब आहे. आपणही त्याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देत नाही. शेतात काम करणारे, पावसात झाडाखाली आडोसा घेणारे, तलावात पोहणाऱ्यांना आकाशात कडाडणाऱ्या विजेपासून अधिक धोका असतो. मात्र, काही खबरदारी घेतली तर यापासून बचाव करता येतो. राज्य सरकारच्या महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांनी यापासून सतर्क राहण्यासाठी काही दिशानिर्देश जारी केले आहेत. आपण घरात असलो तरीही विजेपासून बचावासाठी आवश्यक ती खबरधारी घ्यायला हवी. पाऊस सुरू असताना घरातील विजेवर चालणाऱ्या उपकरणांपासून दूर रहावे. मोबाईल, टेलिफोनचा उपयोग करू नये. खिडकी, दरवाजे बंद ठेवावे. घराच्या छतावर किंवा वऱ्हांड्यात बसू नये. धातूपासून बनलेले पाईप, नळ, फवारा, वॉश बेसीन आदींच्या संपर्कापासून दूर रहावे. डोक्याचे केस उभे झाले तर वीज पडण्याचा धोका तज्ज्ञांच्या मते आकाशात वीज चमकत असेल व तुमच्या डोक्याचे केस उभे झाले, त्वचेला कंप झाला तर त्वरित खाली बसून तुमचे कान बंद करा. कारण, तुमच्या आसपास वीज कोसळणार आहे याचे हे संकेत आहेत.