शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

सुविधाच नाही तर रुग्ण येणार कसे?

By admin | Updated: April 27, 2017 02:07 IST

महापालिकेच्या सर्वात चांगल्या रुग्णालयात सदर येथील रोगनिदान केंद्राचा समावेश असल्याचा दावा केला जातो.

सदर रोगनिदान केंद्र : रुग्णांची संख्या रोडावली गणेश हुड/आनंद डेकाटे   नागपूर महापालिकेच्या सर्वात चांगल्या रुग्णालयात सदर येथील रोगनिदान केंद्राचा समावेश असल्याचा दावा केला जातो. येथे केवळ बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) आहे. रुग्णांना भरती करून घेण्याची सुविधा येथे नाही. फक्त निदान आणि उपचार केले जातात. येथे गरीबच नव्हे तर मध्यमवर्गीय रुग्णही मोठ्या संख्येने येतात. परंतु रुग्णालयाकडे पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे झालेले दुर्लक्ष आणि काळानुरूप अत्याधुनिक यंत्रसामुग्री व सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाही. यामुळे मागील काही वर्षांत येथील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या तीन वर्षांचाच विचार केला असता मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या रोडावली आहे.सदर रोगनिदान केंद्र हे शहरतील जुन्या रुग्णालयापैकी एक आहे. कालांतराने याचा विस्तार करण्यात आला. नवनवीन विभाग सुरू झाले. तशी येथील रुग्णांची संख्याही वाढली. परंतु दरम्यानच्या काळात रुग्णालयातील सुविधांकडे महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे येथील रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. येथील बाह्य रुग्ण विभागातील रजिस्टर बुकमधील नोंदणीनुसार तीन वर्षांपूर्वी रुग्णालयात दररोज सरासरी १५० ते १७५ रुग्ण उपचारासाठी येत असत. सध्या ही संख्या १२५ ते १५० पर्यंत खाली आली आहे. २०१३-१४ मध्ये ४८,९५० रुग्णांनी लाभ घेतला. २०१४-१५ मध्ये ही संख्या ४२,८९२ वर पोहोचली तर २०१५-१६ मध्ये ४०,८३८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यावर्षी यात पुन्हा घट होण्याची शक्यता आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा अभाव सामान्य तपासणीसोबतच या रुग्णालयात पॅथालॉजी, एक्स-रे आणि नेत्ररोग विभाग आहे. परंतु पॅथालॉजीमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री नसल्याने बहुतांश तपासणीसाठी खासगी पॅथालॉजीमध्येच पाठविले जाते. एक्स-रे विभागाचीही तशीच अवस्था आहे. किमान थ्रीडी एक्स-रेची सुविधा उपलब्ध व्हावी, अशी रुग्णांची अपेक्षा आहे. नेत्ररोग विभागाची मशीन अनेक महिन्यांपासून बिघडली आहे. परंतु ती दुरुस्तसुद्धा केली जात नाही. रुग्णालय अपग्रेड व्हावे सदर येथील रुग्णालय जुने आहे. पूर्वी चांगली सेवा मिळायची. आताही मिळते. परंतु चांगली यंत्रसामुग्रीच उपलब्ध नाही. त्यामुळे बाहेर जावे लागते. रुग्णालयातच अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिल्यास रुग्ण त्याचा लाभ घेऊ शकतील. यासाठी फार निधीचीही आवश्यकता नाही. यासंदर्भात केवळ रुग्णच नव्हे तर येथील कर्मचारी स्पष्टपणे काहीही सांगत नसले तरी रुग्णालय अपग्रेड व्हावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे. ईसीजी बंद रुग्णालयात ईसीजीची सुविधा आहे. परंतु अनेक महिन्यांपासून ते बंद आहे. कारण काय कुणालाच माहिती नाही. ज्या ठिकाणी ईसीजी काढले जाते तिथे नेहमीच कुलूप लावलेले दिसून येते. यामुळे गरीब व गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयातून ईसीजी काढावे लागतात. कोट्यवधीची जागा पडून सदरसारख्या बाजारभागात महापालिकेचे रोगनिदान केंद्र आहे. अद्ययावत रुग्णालय उभारण्यासाठी येथे ्रजागा उपलब्ध आह. परंतु प्रशासन व पदाधिकाऱ्यांची रुग्णालय अपग्रेड करण्याची इच्छा नसल्याने येथील कोट्यवधींची जागा वापराविना पडून आहे. अद्ययावत रुग्णालय उभारल्यास दक्षिण-पश्चिम व उत्तर नागपुरातील गरजू रुग्णांना याचा लाभ होऊ शकतो.