शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

-तर दूध, भाजीपाला पाठविणार नाही

By admin | Updated: June 2, 2017 02:21 IST

विविध शेतकरी संघटनांच्या संयुक्त कृती समिती असलेल्या किसान क्रांती अंतर्गत आजपासून शेतकऱ्यांनी संप पुकारला.

वाकोडीत शेतकऱ्यांचे धरणे : सरकारला इशारालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध शेतकरी संघटनांच्या संयुक्त कृती समिती असलेल्या किसान क्रांती अंतर्गत आजपासून शेतकऱ्यांनी संप पुकारला. सातारा-सांगलीतील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध व भाजीपाला फेकून पहिल्याच दिवशी आपली ताकद दाखविली. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. नागपूर व विदर्भात या आंदोलनाचे लोण उशिरा पोहोचल्याने संपूर्ण नागपूर जिल्ह्यात आंदोलनाची तीव्रता दिसून आली नाही. मात्र शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात वाकोडी या गावात धरणे आंदोलन करून शेतकऱ्यांनी आपणही आंदोलनात मागे नसल्याचे दाखवून दिले. पाटणसावंगी येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकोडी या गावात शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात ग्राम पंचायतीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष राम नेवले यांच्या नेतृत्वातील या आंदोलनात अरुण केदार, राजू नागुलवार, अरविंद देशमुख, प्रभाकर काळे, ज्ञानेश वाकुडकर उपस्थित होते. वाकोडी या गावातील आशिष राऊत हे दुधाचा व्यवसाय करतात. आंदोलनादरम्यान त्यांनी दुधाची कॅन आंदोलन स्थळी जमिनीवर टाकून यापुढे आपण शहराला दूध पुरवठा करणार नाही, असा संकल्प केला. तसेच विनायक खोरगडे या शेतकऱ्याने भाजीपाला फेकून शहराला भाजीपाला न पाठविण्याचा निर्णय घेतला.