शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘आयएएस’साठी जिद्द हवी!

By admin | Updated: November 1, 2015 03:17 IST

नागरी सेवा करिअर करण्यासाठी उत्तम क्षेत्र आहे. परंतु त्यासाठी कठोर परिश्रमाची तयारी हवी असते. अनेकजण शॉर्टकट मार्गाने ‘आयएएस’ बनण्याचे स्वप्न पाहतात.

अनुप कुमार : ‘मी, आयएएस बोलतोय’ मार्गदर्शन शिबिरनागपूर : नागरी सेवा करिअर करण्यासाठी उत्तम क्षेत्र आहे. परंतु त्यासाठी कठोर परिश्रमाची तयारी हवी असते. अनेकजण शॉर्टकट मार्गाने ‘आयएएस’ बनण्याचे स्वप्न पाहतात. मात्र ते स्वप्न कधीही पूर्ण होत नाही. ‘आयएएस’ बनण्यासाठी जिद्द व परिश्रमाची जोड हवी असते, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी केले. संविधान फाऊंडेशन व प्रयाण ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने युपीएससी, एमपीएससी व सनदी अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शनिवारी ‘मी, आयएएस बोलतोय’ या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून अनुपकुमार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संविधान फाऊंडेशनचे संस्थापक इ. झेड़ खोब्रागडे होते. अतिथी म्हणून सीबीआयचे उपमहानिरीक्षक संदीप तामगाडगे, संबोधी करिअर अ‍ॅकेडमीचे संचालक मंगेश बोरकर, अतिरिक्त आयुक्त (आयटी) क्रांती खोब्रागडे व स्वच्छंद चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रमाला स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. अनुपकुमार यांनी विद्यार्थ्यांसमोर स्वत:चे अनुभव सांगत, नागरी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाच्या टीप्स दिल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दोन ते तीन वर्ष कठोर परिश्रम करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, या परीक्षेच्या तयारीसाठी जिद्द, प्रयत्न व ध्यास सर्वांत महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे जिद्द असेल, तर तुम्हाला कुणीही रोखू शकणार नाही. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी रटेल ज्ञान उपयोगी ठरत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास केला पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी संबोधी करिअर अ‍ॅकेडमीचे संचालक मंगेश बोरकर, संदीप तामगाडगे, इ. झेड़ खोब्रागडे व क्रांती खोब्रागडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संचालन प्रियंका बागडे यांनी केले.(प्रतिनिधी)