शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

अभिमान वाटेल असेच काम माझ्या हातून घडेल

By admin | Updated: December 29, 2014 02:47 IST

सरस्वती शाळेने मला जीवनात खूप काही शिकविले. त्यामुळेच मी यशस्वी झालो. सरस्वती परिवाराने दिलेल्या प्रेमाचा स्वीकार करतांनाच माझ्या सर्व मित्रांना अभिमान वाटेल असेच काम ..

नागपूर : सरस्वती शाळेने मला जीवनात खूप काही शिकविले. त्यामुळेच मी यशस्वी झालो. सरस्वती परिवाराने दिलेल्या प्रेमाचा स्वीकार करतांनाच माझ्या सर्व मित्रांना अभिमान वाटेल असेच काम माझ्या हातून घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला. सरस्वती शाळेतील प्रांगणात ५५ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्याचा आगळावेगळा उपक्रम राबवून आपल्याच शाळेतील विद्यार्थी मुख्यमंत्री झाल्याचा आनंदोत्सव साजरा केला. मु्ख्यमंत्री यांच्यासह आई सरिता फडणवीस, अमृता देवेंद्र फडणवीस आणि द्विविजा फडणवीस यांचा गौरव करण्यात आला. सरस्वतीयन्सच्या ५५ बॅच एकत्र येण्याचा हा बहुदा पहिलाच उपक्रम असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, युनायटेड नेशनमध्ये बोलण्याच्या संधीपेक्षाही आपल्या शाळेत बोलण्याची संधी मिळणे हा प्रसंग अत्यंत महत्त्वाचा आहे. या शाळेने दिलेल्या जीवनमूल्यामुळेच सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. सरस्वती शाळेतील विद्यार्थीदशेतील आठवणींना त्यांनी उजाळा दिला. फडणवीस यांच्यासह ५५ बॅचेसचे माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षकांचा ग्रुप फोटो काढण्यात आला. आपल्या सहपाठकाला मानाचा मुजरा करण्यासाठी १९५९ ते २०१४ पर्यंतचे १ हजार ४०० पेक्षा जास्त माजी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. प्रारंभी वीरकरे यांनी स्वागतपर भाषण केले. माजी विद्यार्थी राकेश पुरोहित आणि शिक्षिका सावित्री यांनी फडणवीस यांच्या शालेय जीवनाविषयी माहिती दिली. आभार आयोजन समितीचे प्रमुख डॉ. अनुप मरार यांनी मानले. या सोहळ्याच्या आयोजनासाठी मुख्याध्यापक प्रभू रमण, संस्थेच्या अध्यक्षा सी.आर. सुब्रमण्यम, श्रीमती जिचकार, अलोक यादव, निखिल मुंडले, श्रीकृष्ण बुटी, डॉ. अनुप मरार, रिता बुधे, राजेश संघानी, राजेंद्र कुळकर्णी, विवेक मिश्रा, अमोल काळे यांनी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)