शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

सीएमच्या भेटीसाठी हैदराबाद हाऊस ‘फुल्ल’

By admin | Updated: May 4, 2015 02:26 IST

नागपूरकर मुख्यमंत्री नागपूरच्याच नागरिकांना सहज उपलब्ध होतो, त्यांच्याशी भेट घेतो, निवेदन स्वीकारतो

नागपूर : नागपूरकर मुख्यमंत्री नागपूरच्याच नागरिकांना सहज उपलब्ध होतो, त्यांच्याशी भेट घेतो, निवेदन स्वीकारतो आणि संवादही साधतो,असे सुखावणारे चित्र रविवारी मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयी (हैदराबाद हाऊस) दिसून आले. मुख्यमंत्र्याना भेटण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे हैदराबाद हाऊस फुल्ल झाले होते.नागपूरकर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर मुख्यमंत्र्यांचे सचिवालय नागपुरातही सुुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली होती. त्याची दखल घेत एरवी फक्त हिवाळी अधिवेशन काळातच सुरू राहणारे सचिवालय फडणवीस यांनी पुन्हा सुरू केले. स्थानिक नागरिकांना भेटता यावे हा सचिवालय सुरू करण्यामागचा उद्देश होता. रविवारी या उपक्रमाला सुरुवात झाली. दरम्यान मुख्यमंत्री निवेदन स्वीकारणार असल्याची बातमी पसरताच शेकडो नागरिकांनी त्यांना भेटण्यासाठी हैदराबाद हाऊस गाठले. काही वेळातच तेथे लांबच लांब रांगा लागल्या. शेतकरी, महिला कामगार, सेवानिवृत्त, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि तरुणांचा समावेश होता. काही अपंगही होते तर काही लहान मुलेही आली होती. दु. ४.२० वा.पासून फडणवीस यांनी निवेदने स्वीकारण्यास सुरुवात केली. तब्बल ८०० पेक्षा अधिक लोकांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्याशी संवादही साधला. उपस्थित अधिकाऱ्यांना प्रश्न निकाली काढण्याच्या सूचनाही दिल्या. त्यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा व पोलीस आयुक्त शारदाप्रसाद यादव होते.आपल्या प्रश्नांची राज्याचा मुख्यमंत्री थेट दखल घेतो हे पाहून नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.(प्रतिनिधी)