लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : महिला पाेलीस कर्मचाऱ्याच्या पतीने घरीच छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पारशिवनी शहरात साेमवारी (दि. २०) सकाळी उघडकीस आली.
योगेश लोखंडे (३८, रा. पोलीस क्वाॅर्टर, पारशिवनी) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या पत्नी कविता याेगेश गाेंडाने-लाेखंडे या पाेलीस दलात कार्यरत असून, त्यांची सध्या पारशिवनी पाेलीस ठाण्यात नियुक्ती आहे. याेगेश चारचाकी वाहने किरायाने देण्याचा व्यवसाय करायचे. काेराेना संक्रमणामुळे त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला हाेता. त्यातच मानसिक तणावामुळे त्यांना दारूचे व्यसनही जडले हाेते. याच तणावातून ते घरी भांडणही करायचे. दरम्यान, साेमवारी सकाळी ते खाेलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे कविता यांनी लगेच पाेलिसांना माहिती देत त्यांना पारशिवनी शहरातील ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे डाॅक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घाेषित केले. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये पाठविण्यात आला. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी कविता गाेंडाने-लाेखंडे यांच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा पळनाटे करीत आहेत.