शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदानातून मानवतेचे दर्शन

By admin | Updated: August 15, 2015 02:55 IST

स्वातंत्र्यानंतर, स्वातंत्र्य मिळाल्यावर इतक्या वर्षांनंतर आपण एकविसाच्या शतकातल्या दीड दशकाच्या उंबरठ्यावर आहोत,

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मेश्राम कुटुंबीयांचा संकल्प : २८ जणांनी भरला अवयवदानाचा अर्ज सुमेध वाघमारे नागपूरस्वातंत्र्यानंतर, स्वातंत्र्य मिळाल्यावर इतक्या वर्षांनंतर आपण एकविसाच्या शतकातल्या दीड दशकाच्या उंबरठ्यावर आहोत, परंतु आजही अवयवदानाची चळवळ बाल्यावस्थेतच आहे. यामुळेच वेळेत अवयवदानासाठी दाता मिळाला असता व अवयव प्रत्यारोपण झाले असे तर कदाचित ते वाचले असते, असे वृत्त आपण ऐकतो, वाचतो, हळहळतो. मात्र, अवयव दान करण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. आज भारतात हजारो लोक अवयवदनासाठी दात्यांच्या प्रतीक्षेत आयुष्याचे अखेरचे क्षण मोजत आहेत. उपराजधानीत तर २००वर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत. याची दखल घेत मरणोत्तर देहदानाचा आणि मेंदू मृत झाल्यानंतर अवयवदानाचा संकल्प एकाच कुटुंबातील २८ जणांनी केला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला ७५ वर्षांच्या आजोबांपासून ते २ वर्षाच्या नातवंडापर्यंत सर्वांनी मिळून या महादानासाठी अर्ज भरला. त्यांच्या या संकल्पनेने स्वातंत्र्यदिनाला नवा अर्थ प्राप्त झाला. हिंगणा येथील मेश्राम ले-आऊट येथील रहिवासी असलेले गंगाराम मेश्राम यांचे हे कुटुंब आहे. त्यांना ही प्रेरणा ‘जागतिक अवयव दानदिनी’ ‘लोकमत’ने आवाहन केलेल्या वृत्तातून मिळाली आहे. म्हणावी तशी जागृती नाहीअवयवदानातून मानवतेचे दर्शन नागपूर : अवयवदानातून दुसऱ्यांना जीवनदान करण्याचे पुण्यकर्म कितीही मोठे असले तरी याबाबत अजूनही म्हणावी तशी जागृती झालेली नाही. सरकार, स्वयंसेवी संस्थांकडून या जागृतीसाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. यामुळे आताशा थोडेफार लोक अवयवदानासाठी पुढे येऊ लागले असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु ते व्यापक होण्यासाठी हा संकल्प केल्याचे मेश्राम कुटुंबाचे मुख्य असलेले ७५ वर्षीय गंगाराम मेश्राम यांनी सांगितले. या अभिनव संकल्पनेबाबत त्यांचा मुलगा व सेवादल महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे विभागप्रमुख प्रा. सुशील मेश्राम म्हणाले, इंग्रजांपासून स्वातंत्र्य ही गोष्ट जुनी झाली आहे. दरवर्षी त्यात नवा अर्थ भरणे आवश्यक आहे. त्यातून स्वातंत्र्याला नवनवीन अर्थ व उत्साह प्राप्त होतो. मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा सदस्य आहे. सुरुवातीपासूनच अवयवदानाची संकल्पना मनात खदखदत होती. परंतु कुणासमोर बोलून दाखविली नाही. माझे वडील गंगाराम मेश्राम, त्यांचे दोन भाऊ चंदू मेश्राम (६४) व गोपाल मेश्राम (६१) त्यांच्या पत्नी, मुले, नातवंड असे २८ जणांचे आमचे संयुक्त कुटुंब आहे. सर्वात लहान कुशल विशाल मेश्राम हा दोन वर्षांचा आहे. (प्रतिनिधी)