शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

‘एचयूआयडी’ने ज्वेलरी उद्योगाचे नुकसान होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:07 IST

- सराफांमध्ये भीती : प्रक्रियेत उशीर, ज्वेलर्स असोसिएशनचे मंत्र्यांना पत्र नागपूर : सराफांना हॉलमार्क दागिन्यांची विक्री बंधनकारक केल्यानंतर हॉलमार्किंग ...

- सराफांमध्ये भीती : प्रक्रियेत उशीर, ज्वेलर्स असोसिएशनचे मंत्र्यांना पत्र

नागपूर : सराफांना हॉलमार्क दागिन्यांची विक्री बंधनकारक केल्यानंतर हॉलमार्किंग सेंटरतर्फे नियमांतर्गत दागिन्यांवर एचयूआयडी (हॉलमार्किंग युनिक आयडेन्टिफिकेशन) क्रमांकाची नोंद करण्यात येत असल्याने सराफांचे सर्वाधिक नुकसान होत असून त्यामुळे दुकाने बंद होणार असल्याची भीती सराफा व्यक्त करीत आहेत.

ऑल इंडिया जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे संचालक आणि नागपूर सराफा असोसिएशनचे सचिव राजेश रोकडे म्हणाले, १ जुलै २०२१ पासून हॉलमार्क दागिन्यांवर एचयूआयडी क्रमांकाची नोंद करण्याचे बंधन भारतीय मानक ब्यूरोच्या हॉलमार्किंग सेंटरवर टाकण्यात आले आहे. पण देशभरात हॉलमार्किंग सेंटरची कमतरता असल्याने ८०० पैकी केवळ २५६ जिल्ह्यातच हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आले आहे. पुढे नवीन सेंटर सुरू झाल्यानंतर त्या त्या जिल्ह्यात हॉलमार्किंग बंधनकारक होणार आहे. एचयूआयडीकरिता आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर आणि सेंटर नसल्याने दागिन्यांवर एचयूआयडी क्रमांक टाकण्यास जास्त वेळ लागत आहे.

आठ दिवसांचे वेटिंग

नागपुरात दोन हॉलमार्किंग सेंटर असल्याने एचयूआयडीकरिता आठ दिवसांचे वेटिंग आहे. हीच स्थिती अन्य शहरातही आहे. यामुळे ग्राहकांना दागिन्यांची डिलिव्हरी वेळेत देण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होत आहे. या स्थितीसंदर्भात नागपूर सराफा असोसिएशने केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून एचयूआयडीचे नियम त्वरित मागे घेण्याची विनंती केली आहे. सराफा सोन्याच्या शुद्धतेबाबत कटिबद्ध आहेत, पण एचयूआयडीमुळे व्यवसायाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे बेरोजगारी आणि समस्या वाढणार आहे.

एचयूआयडी त्रासदायक का?

एचयूआयडी हे हॉलमार्किंग दागिन्याची नोंद करणारा एक युनिक आयडेन्टिफिकेशन क्रमांक आहे. त्याद्वारे दागिन्याचे वजन, कॅरेट आणि कुठे तयार झाला, याची माहिती मिळते. हा क्रमांक हॉलमार्क सेंटरतर्फे बीआयएस पोर्टलवर अपलोड करण्यात येतो. त्यानंतर दागिन्यात कुठलीही सुधारणा करता येत नाही. जर १५ ग्रॅमच्या मंगळसूत्रात नवीन पेंडेंट टाकायचे असेल वा गोफ लहान करायचा असेल तर ते शक्य नाही. त्यामुळे सराफा व्यवसाय ठप्प होणार असल्याची भीती रोकडे यांनी व्यक्त केली.