नागपूर : पाच दिवसीय कॉम्पेक्स एक्स्पो आणि डेस्टिनेशन आयटीचा समारोप सोमवारी झाला. पाच दिवसात एक लाखापेक्षा जास्त ग्राहक आणि पे्रक्षकांनी हजेरी लावली शिवाय अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नवनवीन उपकरणे आणि तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. २३ व्या कॉम्पेक्सचे आयोजन विदर्भ कॉम्प्युटर अॅण्ड मीडिया डीलर्स वेलफेअर असोसिएशनतर्फे (व्हीसीएमडीडब्ल्यूए) कस्तूरचंद पार्कवर करण्यात आले. एक्स्पोमध्ये नामांकित कंपन्यांचे २० पॅव्हेलियन आणि ७२ स्टॉल होते. आयटी विक्रेते व वितरकांनी सुरक्षात्मक उपकरणे, सीसीटीव्ही, घरगुती सुरक्षा, वायफाय सुरक्षा कॅमेरे, शैक्षणिक सॉफ्टवेअर, अॅन्टीव्हायरस सोल्युशन्स, गेम, प्रिंटर्स, की-बोर्ड, वेब कॅम, पेन ड्राईव्ह, स्पीकर्स, पीटीझेड हायरेंज उत्पादने स्टॉलवर प्रदर्शित केली होती. डेलचे एक्सक्ल्युझिव्ह स्टोअर चालविणाऱ्या डाटाट्रोनिक्स सिस्टीमने ३६० अंश फिरणारा ११.५ टच स्क्रीन लॅपटॉप प्रदर्शित केला होता. कास्परस्का आणि नेट प्रोटेक्टर कंपनीची इंटरनेट सिक्युरिटी उत्पादने होती. शेनायडर इलेक्ट्रिकने डाटा सेंटर सोल्युशन्सचा डेमो सादर केला. अरिहंत ट्रेडर्स, विबग्योर, एव्हरटॉप कॉम्प्युटर, अक्षय एक्झिम, टेक्नोसॉफ्ट इंटिग्रेटेड सोल्युशन्स प्रा.लि., कॅनॉन, रिको, सिग्नेट टेक्नॉलॉजीस प्रा.लि.,एक्सेलर आयटी अॅण्ड लर्निंग सोल्युशन्स आदींनी आपापली उत्पादने प्रदर्शित केली होती. कॉम्पेक्स आयटी क्विझला उत्तम प्रतिसाद मिळाला. विजेत्यांना आकर्षक पुरस्कार देण्यात आले. उद्घाटन मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते झाले. सायबर सिक्युरिटी, डाटा सेंटर, डाटा मॅनेजमेंट व स्टोरेज आदींवर चर्चासत्र पार पडले.आयोजनासाठी असो.चे अध्यक्ष प्रशांत उगेमुगे, उपाध्यक्ष हितेश पारेख, सचिव विनोद वर्मा, कोषाध्यक्ष मनोज कुल्लरवार, सहसचिव नरेश घोरमारे, कार्यकारी सदस्य मुरलीधरन, राजन मानापुरे, प्रमोद वाळके, विनोद पुसदकर, विष्णुकांत बेले, दिनेश नायडू आदींनी विशेष परिश्रम घेतले. (वाणिज्य प्रतिनिधी)
‘आयटी एक्स्पो’त प्रचंड गर्दी
By admin | Updated: January 20, 2015 01:18 IST