शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

कसे होणार लसीकरण? तुटवडा कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या नियंत्रणासाठी लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात आहे; परंतु लसीकरणाचा तुटवडा मात्र अजूनही संपलेला ...

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या नियंत्रणासाठी लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात आहे; परंतु लसीकरणाचा तुटवडा मात्र अजूनही संपलेला नाही. शनिवारी नागपूर जिल्ह्याला केवळ २९०० लसीचा डोस प्राप्त झाला. यामुळे लसीकरणाचा कोटा पूर्ण होणार तरी कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लसीच्या तुटवड्यामुळे सरकारने १८ वर्षांवरील लोकांचे लसीकरण सध्या थांबवले असून, ४५ वर्षांवरील लोकांचा दुसरा डोस पूर्ण करण्यावर जास्त भर दिला जात आहे; परंतु दुसऱ्या डोससाठी नागरिकांची भटकंती अजूनही सुरूच आहे. अनेक जण दररोज लसीकरण केंद्रावर जाऊन परत येत आहेत.

नागपूर जिल्ह्याला शनिवारी २९०० डोसेज प्राप्त झालीत. नागपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कमी प्रमाणात मिळालेल्या कोव्हॅक्सिन या लसीचे हे डोस आहेत. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वापर कोव्हिशिल्ड या लसीचा झाला आहे. त्यामुळे या प्राप्त झालेल्या २९०० डोसेसमधून ४५ वर्षांवरील

ज्या नागरिकांनी यापूर्वी कोव्हॅक्सिन घेतली आहे, त्यांनाच दुसरा डोस म्हणून उपयोगी पडणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात दोन हजार व ग्रामीण भागात ९०० असा वाटप या लसीचा करण्यात आला आहे.

१८१ मेट्रिक टन ऑक्सिजन

शनिवारी नागपूरला एकूण १८१ मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त झाला आहे त्यापैकी ११० मेट्रिक टन ऑक्सिजनचे वितरण खासगी व शासकीय रुग्णालय व प्लांटला करण्यात आले आहे.

१६५४ रेमडेसिविर :

नागपूर जिल्ह्याला शनिवारी १६५४ रेमडेसिविर इंजेक्शन प्राप्त झाले आहेत. मागणीनुसार पुरवठा केला जात आहे .