शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

‘डेल्टा प्लस’ला कसे रोखणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:06 IST

नागपूर : राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. या रुग्णांचे लसीकरण झाले नसल्यामुळे विषाणूची ...

नागपूर : राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. या रुग्णांचे लसीकरण झाले नसल्यामुळे विषाणूची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे असताना, नागपूर जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण फार कमी आहे. ४२ लाख लोकसंख्येच्या तुलनेत मात्र मागील सहा महिन्यात पहिला आणि दुसरा डोस मिळून १५,३६,८४१ (३६.५९ टक्के), तर दुसऱ्या डोसचे केवळ ३,४३,३६४ लोकांचे लसीकरण झाले. धक्कादायक म्हणजे, लसीचा तुटवडा पडल्याने मागील चार दिवसांपासून लसीकरणच बंद आहे.

कोरोना विषाणूचा ‘डेल्टा’ हा उत्परिवर्तित प्रकार अत्यंत संसर्गजन्य आहे. आतापर्यंत ८५ देशांमध्ये विषाणूचा हा प्रकार आढळला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक टेद्रोस अदहानम गेब्रेयेसस यांनी लसीकरण न झालेल्यांमध्ये त्याचा वेगाने पसार होत असल्याचा इशारा दिला आहे. या विषाणूचा संसर्ग आणि त्यातून होणारे मृत्यू रोखण्याचा लसीकरण हा एकमेव परिणामकारक मार्ग आहे. लसीकरण न झालेल्यांमध्ये विषाणू वेगाने पसरत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यात लसीकरणाचा वेग मंदावलेला असल्याने मोठा धोका होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

- दुसरा डोस घेण्याचे प्रमाण केवळ ८ टक्के

नागपूर जिल्ह्यात ११,९३,४७७ लोकांनी पहिला डोस घेतला असला तरी लोकसंख्येच्या तुलनेत केवळ ८.१७ टक्के म्हणजे, ३,४३,३६४ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. यात हेल्थ लाइन वर्करमध्ये ३६,३२४, फ्रंट लाइन वर्करमध्ये ३९,५६४, १८ ते ४४ वयोगटात ८,९६३, ४५ ते ६० वयोगटात १,१२,३०६ तर ६० वर्षांवरील वयोगटात १,४६,२०७ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. हा डाेेस झाल्याच्या १४ दिवसांनंतर अ‍ॅण्टिबॉडीज वाढत असल्याने या लसीकरणाकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

- १८ ते ४४ वयोगटात ८,९६३ तरुणांनी घेतला दुसरा डोस

१८ वर्षांवरील तरुणांसाठी १ मेपासून लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणाला चांगला प्रतिसादही मिळत होता. परंतु लसीच्या तुटवड्यामुळे बारा दिवसांतच हे लसीकरण बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली. आता पुन्हा या वयोगटावरील लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी लसीचा तुटवड्यामुळे मागील चार दिवसांपासून लसीकरण बंद आहे. ३० जूनपर्यंत १८ ते ४४ या वयोगटातील २,०३,९९७ तरुणांना लसीचा पहिला डोस, तर ८,९६३ तरुणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला.

जिल्ह्यातील लसीकरण एकूण लसीकरण-१५,३६,८४१ (३० जूनपर्यंत)

पहिला डोस : ११,९३,४७७

दुसरा डोस : ३,४३,३६४

: हेल्थ लाइन वर्कर

पहिला डोस : ६४,९०९

दुसरा डोस : ३६,३२४

फ्रंट लाइन वर्कर

पहिला डोस : १,१८,२१७

दुसरा डोस : ३९,५६४

१८ ते ४४ वयोगट

पहिला डोस : २,०३,९९७

दुसरा डोस : ८९६३

४५ ते ६० वयोगट

पहिला डोस : ४,६०,०११

दुसरा डोस : १,१२,३०६

६० वर्षांवरील वयोगट

पहिला डोस : ३,४६,३४३

दुसरा डोस : १,४६,२०७