शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीनंतर किती पैसा बँकेत आला - प्रकाश आंबेडकर

By admin | Updated: February 17, 2017 22:33 IST

नोटाबंदीनंतर पाचशेच्या किती नोटा छापल्या गेल्या. दोन हजाराच्या किती छापल्या याची माहिती रिझर्व्ह बँकेने जाहीर केली आहे.

ऑनलाइन लोकमत
 नागपूर, दि. 17 - नोटाबंदीनंतर पाचशेच्या किती नोटा छापल्या गेल्या. दोन हजाराच्या किती छापल्या याची माहिती रिझर्व्ह बँकेने जाहीर केली आहे.
परंतु नोटाबंदीनंतर नेमका किती पैसा बँकेत परत आला, याची आकडेवारी अजुनही का जाहीर केली जात नाही ? असा सवाल भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथे केला.
 भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उत्तर नगपुरातील इंदोरा मैदान येथे प्रचर सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे, पक्षाचे ज्येष्ठ नेते मिलिंद पखाले, शहराध्यक्ष रामभाऊ काळे, डॉ. संदीप नंदेश्वर व्यापीठावर होते.
 अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, यांनी आपल्या भाषणात भाजप सरकारला चांगलेच धारेवर धरीत चौफेर टीका केली. ते म्हणाले, बनावट नोटा या पाकिस्तानतर्फे छापल्या जातात. नोटाबंदीनंतर पाकिस्तानने छापलेल्या सर्व बनावट नोटा या बँकेत जमा झाल्या आहेत, असा आमचा आरोप आहे. त्यामुळेच बँकेत किती नोटा आल्या याची आकडेवारी सरकार जाहीर करायला घाबरत आहे.
एकीकडे लोकांना पैसे बँकेत जमा करायला सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे विजय माल्यांसारख्या लोकांचे लाखो कोटी रूपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहेत. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी कुणाचेही कर्ज माफ केले नसल्याचे वक्तव्य केले आहे. परंतु त्यांनी हे वक्तव्य संसदेच्या सभागृहात करावे, असे आव्हान सुद्धा त्यांनी यावेळी दिले.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिवसरात्र स्वच्छतेचा नारा लावतात. परंतु स्वच्छता अभियानातील एक महत्त्वाचा घटक असलेल्या स्वच्छता कामगाराकडेच त्यांचे दुर्लक्ष आहे. देशभरातील सफाई कामगारांवर जवळपास अडीच हजार कोटीचे कर्ज आहे. ते कर्ज नरेंद्र मोदी माफ करतील का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. भाजप सरकार कोणताही निर्णय विचारपूर्वक घेत नाही. मनात आले घेतला निर्णय असा भाजपचा कारभार आहे. मनात आले, नवाज शरीफ
यांना भेटायला गेले. मनात आले नोटाबंदी केली. अशा विचार न करणा-या सरकारला आणखी किती दिवस सहन करणार. यांचा मुख्य अजेंडा हा संविधान बदलणे हाच आहे. ह एकमेव निर्णय त्यांनी विचारकरून घेतला आहे. महापालिकेची ही निवडणूक केवळ ट्रायल आहे, खरी लढाई ही २०१९ ची निवडणूक राहणार आहे. तेव्हा आपले घर शाबूत आहे हे दाखवायचे असेल तर आताच निर्णय घ्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
 शुक्रवारी प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर नागपूरसह पूर्व नागुरातील खरबी चौक आणि दक्षिण नागपुरातील जाटतरोटी येथे आयोजित जाहीर सभेला सुद्धा मार्गदर्शन केले.
 
- नागपूरची मेट्रो अपयशी ठरणार
 भाजप सरकार कोणताही निर्णय विचारपूर्वक करीत नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे नागपूरची मेट्रो रेल्वे होय. वहतुकीचा अभ्यास असणा-यांनी ही मेट्रो फायद्याची ठरणार नाही, असे आधीच स्पष्ट केले आहे, त्यानंतरही मेट्रो रेल्वे केली जात आहे. परंतु ती निश्चित अपयशी ठरेल, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.