शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
8
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
9
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
10
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
11
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
12
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
13
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
14
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
15
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
16
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
17
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
18
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
19
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
20
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय

दूध उत्पादन कसे वाढणार ?

By admin | Updated: December 10, 2014 00:42 IST

संकटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक आधारासाठी जोडधंदा म्हणून गाई-म्हशी पाळण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी सरकारकडून अनुदानही दिले जाते. परंतु या योजना राबविण्याची जबाबदारी असलेल्या पशुसंवर्धन

पशुसंवर्धन विभागाला सहआयुक्त नाही : डॉक्टरविना १२२ दवाखाने गणेश हूड - नागपूर संकटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक आधारासाठी जोडधंदा म्हणून गाई-म्हशी पाळण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी सरकारकडून अनुदानही दिले जाते. परंतु या योजना राबविण्याची जबाबदारी असलेल्या पशुसंवर्धन विभागाला पूर्णवेळ प्रादेशिक सहआयुक्त नाही. १२२ पशुवैद्यकीय दवाखान्यांना पशुधन विकास अधिकारी नाहीत. अशा परिस्थितीत राज्यातील दूध उत्पादन कसे वाढणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील दूध उत्पादन वाढीसाठी महत्त्वाची भूमिका असलेल्या पशुसंवर्धन विभागाकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. विभागाची जबाबदारी असलेले प्रादेशिक सहआयुक्त पद रिक्त आहे. उपायुक्त डॉ. जे.एस. सोनबरसे ही जबाबदारी सांभाळत आहेत. सहापैकी तीन उपायुक्तांची पदे रिक्त आहेत. त्यातच दोन उपायुक्त पुढील दोन महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. म्हणजे एकच उपायुक्त कार्यरत राहतील. ४६ सहायक आयुक्तांपैकी १२, पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या ४०६ पैकी १२२ पदे रिक्त आहेत. वर्ग ३ व ४ च्या १०११ पैकी १४२ पदे रिक्त आहेत. तसेच पशुधन पर्यवेक्षकांची ४०० पदे रिक्त आहेत. पशुसंवर्धन विभागात मागील १२ वर्षांत पदभरती झालेली नाही. त्यातच दरवर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने रिक्त पदांची संख्या दरवर्षी वाढत आहे. (प्रतिनिधी)योजनांचे नियोजन नाहीविभागाला प्रादेशिक सहआयुक्त नाही. त्यातच उपायुक्त व सहायक आयुक्तांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विभागामार्फन राबविण्यात येणाऱ्या योजनांचे नियोजन नाही. तालुका ते प्रदेश पातळीवर समन्वय विस्कळीत झाला आहे. तांत्रिक कामे ठप्प असल्याचे चित्र आहे.