शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

‘हजार रुपयात कसा संसार व्हईन जी’

By admin | Updated: December 11, 2014 00:50 IST

कमावत्या पतीचा हात निकामी झाल्यामुळे त्याच्याकडून काम होत नाही. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मुलगाही १२ वीनंतर शिक्षणास मुकला. अंगणवाडी पोषण आहाराच्या कामात खूप मेहनत

लताबाईची व्यथा : हलाखीच्या परिस्थितीमुळे अडले मुलाचे शिक्षणदयानंद पाईकराव -नागपूरकमावत्या पतीचा हात निकामी झाल्यामुळे त्याच्याकडून काम होत नाही. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मुलगाही १२ वीनंतर शिक्षणास मुकला. अंगणवाडी पोषण आहाराच्या कामात खूप मेहनत करूनही महिन्याकाठी एक हजार रुपये पदरात पडतात. ‘यवढ्या कमी पैशात कसा संसार व्हईन जी’, अशा शब्दात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील बेंबळा (बु.) येथील लता ठाकरे (४७) या महिलेने आपली व्यथा मांडली.आयटकच्यावतीने बुधवारी अंगणवाडीतील शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या महिलांचा मोर्चा हिवाळी अधिवेशनावर काढण्यात आला. मोर्चात अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील बेंबळा (बु.) येथील लता गुणवंत ठाकरे (४७) ही महिला सामील झाली होती. लताबाईचे पती गुणवंत ठाकरे ६० वर्षांचे आहेत. ते शेतीवर मजुरी करायचे. परंतु एका भांडणात त्यांचा हात निकामी झाल्यामुळे आता त्यांच्याकडूनही काम होत नाही. त्यांचा मुलगा सतीश (२८) हा बारावीपर्यंत शिकला. वडिलांची मजुरी बंद झाल्यामुळे आता संसाराची जबाबदारी लताबाई आणि त्यांचा मुलगा सतीशवर येऊन पडली. शालेय पोषण आहार तयार करण्याचे काम त्या करतात. यात सुरुवातीला महिन्याचे फक्त ३०० रुपये मिळायचे. चार वर्षांपासून हे मानधन एक हजार रुपये करण्यात आले. परंतु महागाईच्या काळात कितीही काटकसर केली तरी एक हजार रुपयात संसार चालविणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. घरच्या आर्थिक स्थितीमुळे त्यांचा मुलगा सतीशने शिक्षण अर्धवट सोडून तो सुद्धा मजुरीच्या कामाला लागला. लताबाई आयटकच्या मोर्चात सहभागी झाल्या. आपल्याला शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी सकाळी १० वाजताच अंगणवाडीत जावे लागते. तेथे साफसफाई, वर्ग स्वच्छ करून आहार बनविणे, भांडी धुणे ही कामे करावी लागत असून त्यासाठी दुपारी ४ वाजत असल्याचे त्यांनी सांगितले. एवढी मरमर करून पदरात पडतात फक्त एक हजार. एवढ्या कमी रकमेत काय करणार, असा सवाल त्यांनी चिंताग्रस्त चेहऱ्याने उपस्थित केला. शासनाने किमान पाच हजार रुपये तरी मानधन केल्यास संसारात हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)