शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

नागपुरात निवासी डॉक्टरांसाठी २५० खोल्यांचे वसतिगृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 22:58 IST

जर्जर झालेल्या व अर्धवट सोयींच्या वसतिगृहापासून मेडिकलच्या निवासी डॉक्टरांची सुटका होणार आहे. मेडिकल प्रशासनाच्या अथक परिश्रमानंतर ५७ कोटींच्या पाच मजली वसतिगृहाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. २५० खोल्या असलेली ही इमारत पर्यावणपूरक म्हणजे ‘ग्रीन बिल्डिंग’ असणार आहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ही पहिली इमारत ठरणार आहे.

ठळक मुद्देपहिल्यांदाच ५७ कोटींची ‘ग्रीन बिल्डिंग’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जर्जर झालेल्या व अर्धवट सोयींच्या वसतिगृहापासून मेडिकलच्या निवासी डॉक्टरांची सुटका होणार आहे. मेडिकल प्रशासनाच्या अथक परिश्रमानंतर ५७ कोटींच्या पाच मजली वसतिगृहाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. २५० खोल्या असलेली ही इमारत पर्यावणपूरक म्हणजे ‘ग्रीन बिल्डिंग’ असणार आहे. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ही पहिली इमारत ठरणार आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिळून ५०० निवासी डॉक्टर आपली सेवा देतात. या डॉक्टरांच्या निवासासाठी ‘मार्ड’ वसतिगृह व वसतिगृह क्रमांक सात हे आहे. या दोन्हींची क्षमता २५०वर नाही. यामुळे एका खोलीत दोन किंवा त्या पेक्षा जास्त डॉक्टरांना एकत्र राहावे लागते. यात ‘मार्ड’चे वसतिगृह जुने व जीर्ण झाले आहे. येथे गडरलाईनपासून पाण्याची समस्या आहे. ही इमारतच मोडकळीस आल्याने स्वच्छतेला वाव नाही. २४ तास वैद्यकीय सेवेत असणाऱ्या निवासी डॉक्टरांसाठी हे वसतिगृह आरामदायी नाही. येथील गैरसोयींना घेऊन निवासी डॉक्टर नेहमीच तक्रारीचा सूर आळवत असतात. विशेष म्हणजे, तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मेडिकलमध्ये घेतलेल्या ‘कॉफी विथ स्टुडंटस्’मध्ये तर निवासी डॉक्टरांनी वसतिगृहातील तक्रारींचा पाऊसच पाडला होता. यात प्रामुख्याने अस्वच्छता, तुंबलेल्या ड्रेनेज लाईन, घाणीत असलेले स्वच्छतागृह, पाण्याचा तुटवडा आदी तक्रारी होत्या. आव्हाड यांनी या तक्रारींना घेऊन अधिष्ठात्यांना धारेवर धरले होते. याच दरम्यान मेडिकल व शासकीय दंत महाविद्यालयाच्या संयुक्त समितीने वसतिगृहांची पाहणी करून नूतनीकरणाचा प्रस्ताव मंत्र्यांकडे पाठविला होता. परंतु इमारतच मोडकळीस आल्याने नवीन इमारतीचा प्रस्ताव अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी पाठविला. त्याचा पाठपुरावा केला. अखेर शासनाने निवासी डॉक्टरांच्या समस्या लक्षात घेऊन नव्या वसतिगृहासाठी ५७ कोटींची तरतूद केली असून काही निधी मेडिकलच्या तिजोरीत जमाही झाला आहे.वसतिगृहाची इमारत पर्यावणपूरकनिवासी डॉक्टरांसाठी असलेले वसतिगृह पाच मजली राहणार असून इमारत पर्यावरणपूरक असणार आहे. या ‘ग्रीन बिल्डिंग’मध्ये अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा जास्तीत जास्त वापर केला जाणार आहे. इमारतीत २५० खोल्यांची सोय राहणार असून प्रत्येक खोलीमध्ये स्वतंत्र स्वच्छतागृह असेल. विशेष म्हणजे, हे वसतिगृह ट्रॉमा केअर सेंटरच्या मागील दोन एकर परिसरात होणार असल्याने डॉक्टरांना वसतिगृहातून लवकर रुग्णालयात पोहचणे शक्य होईल.पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठीही लवकरच वसतिगृहनिवासी डॉक्टरांच्या नव्या वसतिगृहाच्या बांधकामाला ५७ कोटी रुपये खर्च येणार आहे. अत्याधुनिक सोयी सुविधांनी हे वसतिगृह सज्ज असेल. विशेष म्हणजे ही ‘ग्रीन बिल्डिंग’ असणार आहे. शासन निवासी डॉक्टरांच्या समस्यांबाबत गंभीर असल्यामुळेच या नव्या वसतिगृहाला मंजुरी दिली आहे. मेडिकलमध्ये पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमाच्या जागा वाढत आहे. यामुळे या विद्यार्थ्यांसाठीही वसतिगृहाचा प्रस्ताव विचाराधीन आहे.डॉ. अभिमन्यू निसवाडेअधिष्ठाता, मेडिकल

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयdoctorडॉक्टर