शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

‘किंग आॅफ रोमान्स’ला स्वरमधूर श्रद्धांजली

By admin | Updated: July 21, 2014 00:54 IST

हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात त्याआधी कुणाच्याही वाट्याला न आलेले स्टारडम, ग्लॅमर, लोकप्रियता, यश ज्याला मिळाले त्या सुपरस्टारचे नाव होते राजेश खन्ना. सिनेमाच्या माध्यमातून त्या काळावर,

नागपूर : हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात त्याआधी कुणाच्याही वाट्याला न आलेले स्टारडम, ग्लॅमर, लोकप्रियता, यश ज्याला मिळाले त्या सुपरस्टारचे नाव होते राजेश खन्ना. सिनेमाच्या माध्यमातून त्या काळावर, त्या काळातल्या तरुण पिढीवर अक्षरश: राज्य करणाऱ्या या सदाबहार नायकाला जाऊन आज दोन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने राजेश खन्ना यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी श्री संती गणेशोत्सव मंडळ व खेलैय्या ग्रुपतर्फे व स्वरमधुरा प्रस्तुत ‘जिंदगी का सफर’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन आज रविवारी वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले होते. या सुरेल कार्यक्रमात गायक कलावंतांनी राजेश खन्ना यांच्या गाजलेल्या गीतांचेसादरीकरण केले. मेरे सपनों की रानी, कब आयेगी तू... असं म्हणत प्रियाराधन करणाऱ्या राजेश खन्नांकडे बघून आपल्या स्वप्नामधला राजकुमार असाच असावा, असं त्या काळातल्या प्रत्येक तरुणीला वाटत असे. राजेश खन्नांसारखा गुरुशर्ट, त्यांच्यासारखी केसांची स्टाईल हे त्या काळातल्या तरुणांचं फॅशन स्टेटमेंट होतं. त्यांची ही सर्व खासियत या कार्यक्रमात सादर झालेल्या गाण्यांमधून झळकत होती. राजेश खन्ना यांचा काळ संपला, त्यानंतरच्या काळात सिनेमे कमालीचे बदलले. परंतु राजेश खन्नांचा चाहता वर्ग कधीच बददला नाही. आजच्या कार्यक्रमातही त्याची प्रचिती आली. बाहेर पाऊस कोसळत असतानाही सभागृह खचाखच भरले होते. या माणसाने त्याच्या काळात काय गारुड केलं होतं, हेच दाखवत होते. दर्दी श्रोत्यांची ही गर्दी बघून गायकांनाही प्रेरणा मिळाली व राजेश दुरुगकर, शशी वैद्य, श्रद्धा जोशी व संजय चिंचोले यांनी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळविली. यात काही एकल तर काही युगल गीते होती. एक अनजान हसीना से..., कभी कभी इत्तेफाक से..., ये रेशमी जुल्फे, ये शरबती आंखे...इतना तो याद है मुझे के उनसे मुलाखत हुई...यासारख्या गाण्यातून गायकांनी राजेश खन्नातील अल्लड व रोमँटिक नायकाचे दर्शन घडवले तर हम थे जिनके सहारे...चिंगारी कोई भडके...या गाण्यांमधून राजेश खन्नांच्या आयुष्यातील विरहाच्या वेदनांचे दु:ख मांडले. प्रकाश खंडारे यांनी सेक्सोफोन, टिंकू निखारे यांनी बेस गिटार, प्रसन्न वानखेडे-ऱ्हिदम गिटार, महेंद्र ढोले-की बोर्ड, गोविंद गडीकर-की बोर्ड, रघुनंदन परसतवार-कोंगो/तुंबा, नितीन चिमोटे-ढोलक, अशोक टोकलवार-तबला, संजय बारापात्रे यांनी ड्रमवर साथसंगत केली. कार्यक्रमाचे बहारदार निवेदन डॉ. मनोज साल्पेकर यांनी केले.(प्रतिनिधी)