शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

हनीसिंगला तात्पुरता अटकपूर्व जामीन

By admin | Updated: December 26, 2014 00:54 IST

अश्लील गाणी गाण्याचा आरोप असलेला पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंगला सत्र न्यायालयाने सशर्त तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

सत्र न्यायालय : देशाबाहेर जाण्यास मनाईनागपूर : अश्लील गाणी गाण्याचा आरोप असलेला पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंगला सत्र न्यायालयाने सशर्त तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंग व नवी दिल्ली येथील बादशाह यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. हनीसिंगच्या अश्लील गाण्यांमुळे युवकांवर वाईट परिणाम होत असल्याचे जब्बल यांचे म्हणणे आहे. पाचपावली पोलीस तक्रार नोंदविल्यापासून हनीसिंगला अटक करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी पोलिसांचे पथक दिल्ली व मुंबईला गेले होते. परंतु, त्यांना हनीसिंग सापडला नाही. दरम्यान, हनीसिंगने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी यांनी अर्जातील विविध बाबी लक्षात घेता हनीसिंगला तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. पूर्वपरवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये, पोलिसांना आवश्यक तेव्हा तपासाकरिता उपस्थित राहावे यासह विविध अटी हनीसिंगपुढे ठेवण्यात आल्या आहेत.(प्रतिनिधी)हायकोर्टात याचिका प्रलंबितजब्बल यांच्या तक्रारीवर पाचपावली पोलिसांनी सुरुवातीला सहा महिन्यांपर्यंत काहीच कारवाई केली नव्हती. यामुळे त्यांनी पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली. पोलीस आयुक्तांनीही समाधानकारक कारवाई केली नाही. यानंतर त्यांनी जेएमएफसी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. जेएमएफसी न्यायालयाने पोलिसांचा तपास सुरू असल्याने प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देऊन तक्रार अर्ज खारीज केला होता. परिणामी त्यांनी अ‍ॅड. रसपालसिंग रेणू यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर पोलिसांनी हनीसिंगविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे.