शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

एचआयव्ही बाधितांचा जीव टांगणीला

By admin | Updated: December 10, 2014 00:43 IST

एचआयव्ही बाधितांना औषधवितरण करणाऱ्या राज्यातील ७० अँटी रिट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) केंद्रांवर औषधांचा तुटवडा पडला आहे. अनेक केंद्रांवर औषधांचा महिन्याभराचाही साठाही उपलब्ध नाही.

एआरटी सेंटरवर औषधांचा तुटवडा : ४० हजार बालक औषधाविनासुमेध वाघमारे - नागपूरएचआयव्ही बाधितांना औषधवितरण करणाऱ्या राज्यातील ७० अँटी रिट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) केंद्रांवर औषधांचा तुटवडा पडला आहे. अनेक केंद्रांवर औषधांचा महिन्याभराचाही साठाही उपलब्ध नाही. यामुळे पावणेदोन लाख एचआयव्ही बाधितांचा जीव टांगणीला लागला आहे. विशेष म्हणजे, एचआयव्ही बाधित बालकांना औषधपुरवठा करणाऱ्या कंपनीने नकार दिला आहे. परिणामी, तीन वर्षांपासून ‘लोपीनावीर’हे सिरपच उपलब्ध नसल्याने तब्बल ४० हजार बालक औषधाविना आहेत. एचआयव्ही पूर्ण बरे करता येत नाही म्हणून प्रतिबंध अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी सरकारने एचआयव्ही बाधितांना मोफत उपचार, मार्गदर्शन व औषध वितरणासाठी राज्यभरात मेडिकल रुग्णालयांसह, जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयात एआरटी केंद्र सुरू केले. या केंद्रातून मिळणाऱ्या औषधोपचारांमुळे आरोग्यपूर्ण आयुष्य जगता येते. आयुष्यमान आणि जीवनाची गुणवत्ता वाढते. प्रतिकारशक्ती वाढते, आजाराची वाढ खुंटते आणि संसर्ग होण्याची शक्यताही कमी होते. या आजारात औषधांचा सातत्यपूर्ण मारा शरीराला शक्ती प्रदान करतो, परंतु योग्य वेळी औषध न घेतल्यास, औषधात खंड पडल्यास व्हायरसची वाढ होण्याची प्रक्रि या सुरू होते. म्हणूनच एआरटी केंद्रांवर किमान तीन महिने पुरेल एवढा औषधांचा साठा ठेवण्याचा नियम आहे. त्यातही दर आठवड्याच्या औषधांच्या साठ्यांचा तपशील महाराष्ट्र एड्स कंट्रोल सेंटरला पाठविणे आवश्यक आहे. परंतु ‘नॅशनल एडस कंट्रोल सेंटर’मधून एआरटी केंद्रांना होणारा औषधांचा पुरवठा मागील दोन महिन्यांपासून प्रभावित झाला असून तुटवड्याचे हे मुख्य कारण मानले जात आहे.औषधांसाठी चारवेळा चकराएआरटीच्या प्रत्येक केंद्रावर औषधांचा सहा महिन्याचा साठा असणे आवश्यक आहे, आणि तीन महिन्याचा साठा उरताच त्वरित औषधपुरवठा होणे गरजेचे आहे. सूत्रानुसार सर्वच एआरटी केंद्रावर केवळ महिन्याभराच्या औषधांचा साठा उरला आहे. प्रत्येक केंद्रावर दर दिवशी १५० ते २०० च्यावर रुग्ण येतात. यातील अनेक जण आपली ओळख लपविण्यासाठी जवळचे एआरटी केंद्र सोडून दुसऱ्या जिल्ह्यातील किंवा लांबच्या केंद्रांवर जातात. येथील रुग्णांना पूर्वी एक महिन्याचे औषध दिले जात होते आता १५ ते २० दिवसांचे औषधे दिले जात आहे. यामुळे महिन्याभरात अनेकांना चारवेळा चकरा माराव्या लागत आहे. यात अनेकांना पदरमोड करून प्रवासाचा खर्च सहन करावा लागत असल्याने अनेक रुग्ण औषधांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.उपराजधानीतील दहा हजार एचआयव्ही बाधित प्रभावितमहिन्याभरापासून एचआयव्हीवरील औषधांचा तुटवडा पडल्याने मेडिकल, मेयो व कामठीतील एआरटी केंद्रांवर उपचार घेणाऱ्या सुमारे दहा हजार एचआयव्ही बाधित प्रभावित झाले आहेत. यातील अनेक जणांना हव्या त्या प्रमाणात औषध मिळत नाही. यातच आर्थिक मागासेलपणामुळे अनेकांना येणे-जाणे परवडत नसल्याने औषध घेणे बंद करण्याच्या तयारीत आहेत. असे झाल्यास तुटवड्याचे कारण त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.