शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कमी पटसंख्येच्या शाळांना फटका; १ कोटी ३८ लाखाचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 15:19 IST

नागपूर जिल्हा परिषदेच्या १,५८४ शाळांसाठी पहिल्या टप्प्यात १ कोटी ३८ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. अनुदानाचे वितरण पटसंख्येवर असून, कमी पटसंख्येच्या शाळांना कमी अनुदान मिळणार आहे.

ठळक मुद्देसंयुक्त शाळा अनुदानाचा पहिला टप्पा 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांना भौतिक सुविधेसाठी मिळणाऱ्या संयुक्त शाळा अनुदानाचा पहिला टप्पा लवकरच वितरित होणार आहे. जिल्हा परिषदेच्या १,५८४ शाळांसाठी पहिल्या टप्प्यात १ कोटी ३८ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. अनुदानाचे वितरण पटसंख्येवर असून, कमी पटसंख्येच्या शाळांना कमी अनुदान मिळणार आहे.

संयुक्त शाळा अनुदानाचा विनियोग हा शाळेतील नादुस्त असलेल्या भौतिक वस्तू दुरुस्त करणे तसेच खेळाचे साहित्य, विज्ञान प्रयोगशाळा साहित्य खरेदी, शाळेचे वीज बिल, पाण्याची सुविधा तसेच शिक्षकांना शैक्षणिक साहित्य निर्मितीवर खर्च करण्यात येते. त्याचबरोबर शाळेची वार्षिक देखभाल, शौचालयाची दुरुस्ती आणि इतर भौतिक सुविधा सुस्थितीत ठेवण्यासाठीसुद्धा खर्च करता येतो. यंदा शाळा सुरू होण्यापूर्वीच हा निधी जिल्हा परिषदेला उपलब्ध झाला आहे. शाळा कधी सुरू होणार याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. तोपर्यंत या निधीच्या माध्यमातून शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करता येणार आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने शाळा सुरू व्हायच्या असल्याने गणवेशाचा निधी थांबवून ठेवेत, संयुक्त शाळा अनुदानाचे वाटप केले आहे.संयुक्त शाळा अनुदान वाटप करताना पटसंख्येचा आधार घेण्यात आला आहे. ज्या शाळेचा पट चांगला त्या शाळेला पहिल्या टप्प्यात ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. तर ज्यांचा पट कमी त्यांना ५ हजार रुपये अनुदान मिळणार आहे.

शाळांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यावर भरजिल्हा परिषदेच्या शेकडो शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेला भविष्यात सर्वच शाळा सोलरवर आणायच्या आहेत. पण वीज बिल भरल्यानंतरच महावितरणकडून मान्यता मिळणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने या अनुदानातून खंडित असलेला वीजपुरवठा सुरळीत करण्यास प्राथमिकता द्यावी, असे निर्देश शाळांना दिले आहे.

स्वच्छतेवर भरकोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, मूलभूत सुविधांच्या तरतुदीकरिता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एकूण निधीच्या १० टक्के स्वच्छतेवर खर्च करायचा आहे. निधीचे वितरण जिल्हास्तरावरून शाळा व्यवस्थापन समितीला वितरित होणार आहे.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र