शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मण्यग्रस्तांनी मांडलेला इतिहास अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 02:03 IST

बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल आदी आदिवासी नायकांनी ब्रिटिश साम्राज्य आणि अन्यायग्रस्त समाज व्यवस्थेविरोधात एकाचवेळी व्यापक लढा दिला.

ठळक मुद्देश्रीपाल सबनीस : विनायक तुमराम यांच्या ग्रंथाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल आदी आदिवासी नायकांनी ब्रिटिश साम्राज्य आणि अन्यायग्रस्त समाज व्यवस्थेविरोधात एकाचवेळी व्यापक लढा दिला. अशाप्रकारे दलित, आदिवासी, भटक्या विमुक्तांचेही स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान आहे. मात्र ब्राह्मण्यवादी आणि ब्राह्मण्यग्रस्त इतिहासकारांनी इतिहासात या नायकांची दखल घेतली नाही व त्यांचे कर्तृत्व जाणीवपूर्वक झाकून ठेवले. म्हणूनच ब्राह्मण्यग्रस्तांनी मांडलेला भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास अपूर्ण असल्याचे रोखठोक मत जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.आदिवासी समाजातील विचारवंत, लेखक व राष्टÑपती पुरस्कारप्राप्त डॉ. विनायक तुमराम यांच्या ‘बिरसा मुंडा धरती आबा : जनचेतनेचे विद्रोही रूप’ आणि ‘निर्मला पुतुल और वाहरू सोनवणे की आदिवासी कविताएं : तुलनात्मक अध्ययन’ या दोन ग्रंथांचा लोकार्पण सोहळा रविवारी महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह, रेशीमबाग येथे पार पडला.आदिवासी साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्थेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे, माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, गिरीश गांधी, जेष्ठ कवी सुधाकर गायधनी, आदिवासी कवी वाहरू सोनवणे, राष्टÑसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागाच्या प्रमुख डॉ. वीणा दाढे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, नव्या साम्राज्यवादी व भांडवलशाही धोरणात विकास व आधुनिकतेच्या नावावर आदिवासींना जंगलातून हाकलून त्यांचे शोषण क रण्याची नवी परंपरा रुजविण्यात येत आहे.यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. गंगाधर पानतावणे यांनी, भांडवलशाही आणि सरंजामशाहीपेक्षाही देशात सांस्कृतिक आणि सामाजिक दहशतवाद अधिक धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले. मधुकर पिचड यांनी यावेळी आदिवासींच्या आरक्षणावर अतिक्रमण करणाºया धनदांडग्यांविरोधात लढा देण्याची गरज असल्याचे सांगत, शिक्षणाच्या माध्यमातून अधिक सक्षम होण्याचे आवाहन केले.डॉ. विनायक तुमराम यांनी पुस्तकाबाबत मनोगत व्यक्त करताना मराठी साहित्य क्षेत्राने आदिवासी साहित्याची हवी तशी दखल न घेतल्याची खंत व्यक्त केली.