शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

कस्तूरचंद पार्कवरील ऐतिहासिक वास्तू संकटात

By admin | Updated: August 14, 2016 02:25 IST

शहराच्या मध्यभागी असलेल्या कस्तूरचंद पार्कला आता लोक प्रदर्शन लगण्याचे ठिकाण म्हणून ओळखू लागले आहे.

भिंतींना तडा : कसे होणार संवर्धन ? नागपूर : शहराच्या मध्यभागी असलेल्या कस्तूरचंद पार्कला आता लोक प्रदर्शन लगण्याचे ठिकाण म्हणून ओळखू लागले आहे. येथे वर्षभर कोणते ना कोणते प्रदर्शन सुरू असते. यामुळे येथील मैदानाची स्थिती चिंताजनक झाली आहे. या मैदानाच्या मधोमध असलेल्या हेरिटेज वास्तूकडे देखील कमालीचे दुर्लक्ष होत आहे. या इमारतीची दुरवस्था होत आहे. ही हेरिटेज वास्तू दगडांना कोरून तयार करण्यात आली आहे. मात्र, देखभाल दुरुस्ती नसल्यामुळे या इमारतीच्या भिंतींना तडे जाऊ लागले आहे. एवढेच नव्हे तर हे स्थळ आता असामाजिक तत्त्वांचा अड्डा बनू लागले आहे. असामाजिक तत्त्वांनी या इमारतीच्या भिंतींवर नावे लिहून, विचित्र चित्र काढून त्या विद्रुप केल्या आहेत. बस्तान घेऊन फिरणारे लोक येथे रात्रीचा ठिय्या मांडतात. तेथेच स्वयंपाक करतात. त्यांना रोखणारे येथे कुणीच नाही. पावसामुळे या संपूर्ण मैदानात चिखल झाला आहे. त्यामुळे येथे कोणत्याही खेळांच्या स्पर्धा होताना दिसत नाही. (प्रतिनिधी) रात्री असामाजिक तत्त्वांचा अड्डा कस्तूरचंद पार्क हे रेल्वे स्टेशनपासून एक किलोमीटरवर आहे. रात्रीच्या वेळी कस्तूरचंद पार्कवरील हेरिटेज वास्तूमध्ये असामाजिक तत्त्वांचा अड्डा असतो. येथे जुगार खेळला जातो. दारु घेतली जाते. असामाजिक तत्त्वांच्या हालचाली येथे सुरू असतात. याबाबतच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या, मात्र त्यावर अंकुश आणण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली नाहीत. जिल्हा प्रशासनाची जबाबदारी या मैदानाची देखभाल दुरुस्ती करणे ही जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे. जिल्हा प्रशासनातर्फेच संबंधित मैदान भाड्याने दिले जाते. मात्र, असे असताना या मैदानाच्या मधोमध असलेल्या हेरिटेज वास्तूकडे मात्र जिल्हा प्रशासनाचे लक्ष नाही. या इमारतीच्या कॉलमला भेगा पडू लागल्या आहेत.