शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासतज्ज्ञ भा. रा. अंधारे कालवश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:10 IST

नागपूर : प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ डॉ. भालचंद्र रामचंद्र अंधारे (८५, रा. भरतनगर) यांचे निधन झाले. विदर्भ आणि नागपूरकर भोसलें राजघराण्याच्या ...

नागपूर : प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ डॉ. भालचंद्र रामचंद्र अंधारे (८५, रा. भरतनगर) यांचे निधन झाले. विदर्भ आणि नागपूरकर भोसलें राजघराण्याच्या इतिहासावर त्यांचा विशेष कटाक्ष होता.

डॉ. भा.रा. अंधारे यांनी विदर्भ आणि भोसले राजघराण्यासोबतच स्वातंत्र्ययुद्धातील क्रांतिकारक, बिटिशांचे विदर्भातील वास्तव्य आणि अन्य बऱ्याच विषयावर आयुष्याच्या अखेरपर्यंत संशोधन केले. ते वसंतराव नाईक इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्स अर्थात मॉरिस कॉलेजमधून इतिहास विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्या प्रयत्नातूनच १९८२ मध्ये इतिहास आणि संस्कृती संशोधन केंद्राची स्थापना झाली होती. इतिहासविषयक संशोधनात रस असणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे, हाच या केंद्राच्या स्थापनेमागचा हेतू होता. अंधारे यांच्या घरीच असलेल्या मीरा अंधारे सांस्कृतिक संग्रहालयात अत्यंत दुर्मिळ पुस्तके, महापुरुषांची हस्तलिखिते, सौंदर्यविषयक साधनांचे कलेक्शन जमविले होते आणि ते त्यांच्या निवासस्थानी असलेल्या संग्रहालयावरून दिसत होते. विशेष म्हणजे, या वस्तूंची पाहणी व माहिती घेण्यास येणाऱ्यांना त्या वस्तूसंबंधी इत्थंभूत माहिती ते देत असत. त्यांच्याकडे इतिहासविषय पुस्तकांचा खजिना होता. विदर्भ आणि भोसले राजघराणेसंदर्भातील पत्र, चित्र, कुंडली, आदेशपत्र, प्रशासनव्यवस्था अहवाल, क्रांतिकारक, ब्रिटिश काळातील पुस्तकांसोबतच ऐतिहासिक गडकोट किल्ल्याचा इतिहास संग्रहित होता. सोबतच पेशवा, शिंदे, होळकर, गायकवाड, सुभेदार, पवार यांच्यासंदर्भातील कलाकुसरी, स्वाक्षरी, साधने, लाकडी नक्षीकाम, कपडे, पेंटिंग्स, दारे, खिडक्या, झुले, हुक्का, ज्वेलरी यांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. लोकमान्य टिळकांचे कपडे, पत्र आदी साहित्यही त्यांच्या संग्रही आहेत. त्यांनी इतिहास संशोधनावर बरीच पुस्तके व संशोधन संहितांचे लेखन केले. त्यांच्या कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.