शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

हिमांशु भोयर नागपुरात ‘टॉप’

By admin | Updated: June 12, 2017 02:21 IST

‘आयआयटी’मध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’चा निकाल रविवारी जाहीर झाला.

‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’चा निकाल जाहीर : १५० हून अधिक विद्यार्थी पात्रलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘आयआयटी’मध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’चा निकाल रविवारी जाहीर झाला. शहरातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी हिमांशु भोयर हा अव्वल क्रमांकावर राहिला. त्याने देशपातळीवर ९७ वा क्रमांक पटकाविला. नागपूर शहरातून दीडशेहून अधिक विद्यार्थी चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले असल्याची माहिती विविध महाविद्यालयांतून प्राप्त झाली. ‘जेईई-मेन्स’मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’साठी पात्र ठरले होते. २१ मे रोजी ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’ची परीक्षा पार पडली. ‘जेईई-मेन्स’मध्ये हिमांशु भोयरचा अखिल भारतीय पातळीवर १४५ वा क्रमांक होता. हिमांशुपाठोपाठ ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’च्या निकालात शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा समीर पांडे (एआयआर-१०४) याने बाजी मारली. त्याचप्रमाणे दुर्गेश अग्रवाल (एआयआर-१२४), अंशुल नासेरी (एआयआर-१३७), चैतन्य भूतडा (एआयआर-२४५), प्राग्य रस्तोगी (एआयआर-२७९), अंशुल नांदगावकर (एआयआर-२३७), प्रवीण कोडापे (एआयआर-४६२), कपिल मांडवकर (एआयआर-६०५), अमन ताराचंद राय (एआयआर-७१०), अजिंक्य बोकडे (एआयआर-७८४), हर्ष त्रिवेदी (एआयआर-८४३), हर्ष डोल्हारे (एआयआर-८५५), नेहांक गोंडाणे (एआयआर-८६३), पियुष चव्हाण (एआयआर-८७३) यांनीदेखील पहिल्या हजार विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळविण्यात यश मिळविले.खुल्या प्रवर्गातून ५७७ व्या क्रमांकावर असणाऱ्या अखिलेश गणेशकर या विद्यार्थ्याने अनुसूचित जाती प्रवर्गात देशातून आठवा क्रमांक पटकाविला. शिवाजी विज्ञान महाविद्यालयातून २५ विद्यार्थी चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून ‘आयआयटी’ प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.