शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टात माओवादी साईबाबाचा जामीन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 20:42 IST

बेकायदेशिर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याचा शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खारीज केला. न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व रोहित देव यांनी सोमवारी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देनक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बेकायदेशिर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा याचा शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खारीज केला. न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व रोहित देव यांनी सोमवारी हा निर्णय दिला.साईबाबाने वैद्यकीय कारणावरून जामीन मागितला होता. तेलंगणा येथील खम्मामस्थित स्पंदन हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल कॉर्डिओलॉजीस्ट डॉ. गोपीनाथ यांनी साईबाबाची वैद्यकीय तपासणी करून दिलेल्या अहवालामध्ये साईबाबाला विविध गंभीर आजार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय साईबाबा ९० टक्के दिव्यांग आहे. असे असले तरी न्यायालयाने प्रकरणातील तथ्ये लक्षात घेता साईबाबाला जामीन देण्यास नकार दिला. प्रकरणावरील अंतिम सुनावणीचे वेळी सरकारने साईबाबाचा जामीन अर्ज मंजूर करण्यास जोरदार विरोध केला होता. साईबाबाला जामीन दिल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले होते. अंतिम सुनावणीनंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. तो निर्णय सोमवारी जाहीर करण्यात आला. साईबाबातर्फे अ‍ॅड. मिहिर देसाई व अ‍ॅड. बरुणकुमार तर, सरकारतर्फे अ‍ॅड. प्रशांतकुमार सत्यनाथन यांनी कामकाज पाहिले.अपील प्रलंबित७ मार्च २०१७ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने साईबाबा व त्याच्या साथीदारांना दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे, दहशतवादी संघटनेसाठी कार्य करणे इत्यादी गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून जन्मठेप व अन्य विविध प्रकारची शिक्षा सुनावली आहे. त्या निर्णयाविरुद्ध साईबाबाने उच्च न्यायालयात अपील केले आहे. ते अपील अंतिम सुनावणीसाठी दाखल झाले आहे. त्यामध्ये साईबाबाने जामीन अर्ज दाखल केला होता. अपीलवर अंतिम निर्णय होतपर्यंत वैद्यकीय कारणावरून जामीन देण्यात यावा असे त्याचे म्हणणे होते.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnaxaliteनक्षलवादी