शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट : कोविड रुग्णालयाची तयारी ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 21:37 IST

कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर रूप घेऊ शकते. त्यासाठी प्रत्येक खासगी रुग्णालयाने कोविड रुग्णालय म्हणून कार्यान्वित करण्याची तयारी ठेवावी, अशा सूचना शनिवारी उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने खासगी रुग्णालयांना केल्या.

ठळक मुद्देनेमलेल्या समितीची सुनावणीखासगी रुग्णालयाच्या समस्या जाणून घेतल्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर रूप घेऊ शकते. त्यासाठी प्रत्येक खासगी रुग्णालयाने कोविड रुग्णालय म्हणून कार्यान्वित करण्याची तयारी ठेवावी, अशा सूचना शनिवारी उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने खासगी रुग्णालयांना केल्या.कोविड रुग्णांना उपचार मिळावा, यासाठी शहरातील १०२ रुग्णालये निवडण्यात आली. मात्र यातील ३९ रुग्णालये पूर्णत: कोविड रुग्णालय म्हणून कार्यान्वित आहेत. अन्य रुग्णालयांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी उच्च न्यायालयाने महापौरांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमली आहे. या समितीने उर्वरित ६३ रुग्णालयांची सुनावणी घेतली. यावेळी समितीने सूचना केल्या.समितीचे अध्यक्ष महापौर संदीप जोशी, विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी म्हणून उपायुक्त मिलिंद साळवे, मनपा आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आयएमएच्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी, खासगी रुग्णालयाचे प्रतिनिधी म्हणून डॉ. अनिल लद्दड व समितीचे सचिव, उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी ही सुनावणी घेतली.कोविड रुग्णालय कार्यान्वित करण्यासंदर्भात खासगी रुग्णालयांच्या काय अडचणी आहेत हे जाणून घेण्यासाठी समितीसमोर ६३ रुग्णालयांच्या प्रशासन आणि डॉक्टरांना बोलविण्यात आले होते. सर्व रुग्णालयांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या अडचणी मांडल्या. किती बेड्स मनपाला कोविडसाठी उपलब्ध करू शकतात, याची माहिती दिली. ज्या अडचणी आहेत त्या सोडवून कोविड बेड्स उपलब्ध करून देण्याची लेखी हमी रुग्णालयांनी दिली. त्याची अंमलबजावणी होते की नाही, याचा पाठपुरावा समिती करणार असल्याचेही यावेळी समितीने स्पष्ट केले. विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन आणि स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींनीही त्यांच्या समस्या मांडल्या.२६ रुग्णालयांचे प्रतिनिधी अनुपस्थितसमितीने नागपुरातील ६३ रुग्णालयांना सुनावणीसाठी बोलाविले होते. त्यापैकी २६ रुग्णालयांचे प्रतिनिधी अनुपस्थित होते. या रुग्णालयांना उद्या सोमवारी दुपारी ४ वाजता पुन्हा बोलविण्यात येईल. त्याउपरही ते अनुपस्थित राहिले तर 'कारणे दाखवा' नोटीस पाठविण्यात येईल.कर्मचारी नाही; डॉक्टरांची व्यथासुनावणीत ज्या डॉक्टरांनी आपल्या व्यथा मांडल्या. कोविड काळात कर्मचारी जादा वेतनाची मागणी करून राजीनामा देत आहेत. राजीनामा देऊन ते इतरत्रही रुजू होत नाहीत. परिचारिका ५०-५० हजार रुपयांपर्यंत वेतनाची मागणी करत आहेत. अशा कर्मचाऱ्यांची यादी समितीपुढे सादर करावी. त्यांची सेवा शासकीय आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून घेण्यात येईल, असे समितीने सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या