शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला छळणाऱ्या पतीला कारावास

By admin | Updated: October 17, 2014 01:04 IST

पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या एका पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश सादिक उमर यांच्या न्यायालयाने दोन वर्षे सहा महिने सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली तर अन्य

नागपूर : पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या एका पतीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश सादिक उमर यांच्या न्यायालयाने दोन वर्षे सहा महिने सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली तर अन्य तीन जणांची निर्दोष सुटका केली. अमोल मधुकर धामणकर (३१) रा. वैशालीनगर पाचपावली, असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. कुसुम मधुकर धामणकर (६०), शैलेश मधुकर धामणकर (३५) आणि राखी शैलेश धामणकर (३१), अशी निर्दोष सुटका झालेल्या आरोपींची नावे आहेत. अमोल हा व्यावसायिक असून त्याचा विवाह २००८ मध्ये ओंकारनगर मानेवाडा येथील सोनालीसोबत झाला होता. त्यांना सोहन नावाचा मुलगाही झाला. पुढे २०१० पासून सोनालीच्या छळाला सुरुवात झाली. सोनालीने माहेरहून दोन लाख रुपये आणावे, असा तकादा लावण्यात आला होता. ती दुसऱ्यांदा गरोदर असताना लाथ मारून तिचा गर्भपात करण्यात आला होता. छळाबाबतची तक्रार सोनालीने महिला सेलकडे केली होती. परंतु कोणताही समझोता घडून न आल्याने सोनालीचा पती अमोल, सासू कुसुम, दीर शैलेश आणि जाऊ राखी यांच्याविरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात २७ जून २०१३ रोजी भादंविच्या ४९८ (अ), ३१५, ५०६ (ब), ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक उज्ज्वला देवकर यांनी करून न्यायालयात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. छळाचा गुन्हा सिद्ध होऊन अमोल धामणकर याला शिक्षा सुनावण्यात आली तर इतरांची सर्व गुन्ह्यातून निर्दोष सुटका करण्यात आली. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील माधुरी मोटघरे तर आरोपींच्या वतीने अ‍ॅड. दुरुगकर यांनी काम पाहिले. हे.कॉ. सुरेश शेंडे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)