शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हिमोफिलिया रुग्णांची अमरावतीवारी

By admin | Updated: April 18, 2017 02:09 IST

नागपूर जिल्ह्यात हिमोफिलियाचे निदान न झालेले १० हजार रुग्ण आहेत. यातील दरवर्षी चार-पाच जणांचा मृत्यू होतो.

औषधांच्या तुटवड्याने रुग्ण धोक्यात : नागपुरातच व्हावे ‘अ‍ॅन्टी हिमोफिलिक फॅक्टर’नागपूर : नागपूर जिल्ह्यात हिमोफिलियाचे निदान न झालेले १० हजार रुग्ण आहेत. यातील दरवर्षी चार-पाच जणांचा मृत्यू होतो. या आजाराचे रुग्ण वाचविण्यासाठी ‘अ‍ॅन्टी हिमोफिलिक फॅक्टर’ औषधे महत्त्वाचे ठरते. परंतु राज्यात केवळ ठाणे, अमरावती, नाशीक, कोल्हापूर, केईएम रुग्णालय मुंबई आणि ससून रुग्णालय पुणे येथील केंद्रावरच हे नि:शुल्क औषधे मिळते. यातच गेल्या तीन वर्षांपासून औषधांचा तुटवडा पडल्याने रुग्ण अडचणीत आले आहेत. नागपूर जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मेडिकल, किंवा मेयो किंवा डागा रुग्णालयात ही सेवा सुरू करावी, अशी मागणी जोर धरीत आहे. हिमोफिलिया हा एक आनुवंशिक आजार आहे. या आजार झालेल्या रु ग्णाच्या रक्तात ‘थ्रोम्बोप्ला स्टोन’ नावाच्या घटकाची निर्मिती होत नाही. जखम झाली की रक्त येते. ते रक्त काही क्षणात थांबते, कारण हा आजार नसलेल्या व्यक्तींच्या रक्तात ‘थ्रोम्बोप्लास्टिन’ नावाच्या घटकाची निर्मिती होते. पण ज्याच्या रक्तामध्ये ‘थ्रोम्बोप्लास्टिन’ हा रक्तातला घटक निर्माण होत नाही, त्या व्यक्तीला जर जखम झाली तर रक्तस्राव थांबत नाही. परिणामी शरीरातले रक्ताचे प्रमाण वेगाने घटू लागते. त्यावेळी योग्य ते औषध मिळाले नाही तर रु ग्ण दगावू शकतो. काही रु ग्णांमध्ये शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाला तर मात्र परिस्थिती अधिक गंभीर होते. अशा व्याधीग्रस्ताला दर आठ तासांनी रक्त द्यावे लागते.तज्ज्ञाच्या मते, १० हजार रुग्णांच्या मागे एक हिमोफिलियाचा रुग्ण आढळून येतो. सद्यस्थितीत नागपुरात हिमोफिलियाचे साधारण ४२४ रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, शहर व जिल्ह्यातील लोकसंख्येचा विचार केल्यास नोंद झालेल्या कितीतरी पट जास्त रुग्ण असे आहेत ज्यांचे निदानच झालेले नाही. या व्याधीवर असलेली औषधे अत्यंत महाग आहेत. ते नि:शुल्क अथवा अल्प दरात व्याधीग्रस्तांना उपलब्ध व्हावीत म्हणून हिमोफिलिया सोसायटीने सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. या व्याधीने ग्रस्त असलेल्या एकाचा वार्षिक खर्च सुमारे एक लाख आहे. एका व्याधीग्रस्ताला किती युनिट औषध द्यायचे ते संबंधित व्याधीग्रस्तांच्या वजनावर आणि होणाऱ्या रक्तस्रावावर अवलंबून आहे. नागपूर जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता आणि त्या तुलनेत रुग्णांची संख्या पाहता या विषयी जनजागृती आणि नि:शुल्क ‘अ‍ॅन्टी हिमोफिलिक फॅक्टर’ मिळणे आवश्यक झाले आहे.(प्रतिनिधी)