शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मारेकऱ्यास साहाय्य

By admin | Updated: April 26, 2017 01:49 IST

अ‍ॅड. राजश्री टंडन ऊर्फ राजकुमारी सतीशकुमार सोलोमन खूनप्रकरणी बालगुन्हेगाराला सहाय्य केल्याचा आरोप असलेल्या तिघांचे जामीन अर्ज

 तिघांचा जामीन फेटाळला सत्र न्यायालय : राजश्री टंडन खून प्रकरण नागपूर : अ‍ॅड. राजश्री टंडन ऊर्फ राजकुमारी सतीशकुमार सोलोमन खूनप्रकरणी बालगुन्हेगाराला सहाय्य केल्याचा आरोप असलेल्या तिघांचे जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. पी. अग्रवाल यांच्या न्यायालयाने फेटाळून लावले. मनोज पांडुरंग चौधरी (७४) रा. मानवसेवानगर सेमिनरी हिल्स, आकाश रेवाराम वासुदेवे (१९) रा. सेमिनरी हिल्स आणि अनिता राजेश वनवे (४२) रा. सुरेंद्रगड, अशी आरोपींची नावे आहेत. मृत राजश्री टंडन (५३) ही व्हेटरनरी कॉलेजमागील चौधरी ले-आऊट येथील रहिवासी होती. राजश्री आणि बालगुन्हेगारामध्ये कोणत्या न कोणत्या कारणांवरून वाद व्हायचा. त्यांनी एकमेकांविरुद्ध बरेचदा गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवल्या होत्या. त्यांच्याविरुद्ध गुन्हेही दाखल आहेत. १४ एप्रिल २०१७ रोजी सायंकाळी ६.१५ वाजाताच्या सुमारास पायी जात असलेल्या टंडनचा बालगुन्हेगाराने पाठलाग केला होता. टंडनने स्वत:चा जीव वाचविण्यासाठी मॉन्टेज फोटो स्टुडिओमध्ये शिरताच त्याने स्टुडिओमध्ये टंडनवर चाकूने क्रूरपणे वार करून तिचा जागीच खून केला होता. या बालगुन्हेगाराचे रक्ताने माखलेले कपडे अनिता वनवे हिने आपल्या घराच्या अंगणात जाळले होते. मनोज चौधरी हा बालगुन्हेगाराचा आजोबा असून, त्याने त्याच्यासाठी दुसरे कपडे मागवून दिले होते आणि पळून जाण्यास मदत केली होती. आकाश वासुदेवे याने अ‍ॅक्टिव्हाने या बालगुन्हेगाराला कोराडी येथे सोडून दिले होते. पोलिसांनी भादंविच्या ३०२,२०१ कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. या तिन्ही आरोपींनी जामिनासाठी अर्ज दाखल करताच त्यांचे अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले. न्यायालयात सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)