शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मिळणार मदत

By admin | Updated: May 8, 2016 03:12 IST

श्रीक्षेत्र पारडसिंगा येथे सोमवारी (दि. ९) आयोजित सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळ्यात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त

शंकरबाबांच्या हस्ते सोमवारी वाटप : पारडसिंगा सामूहिक विवाह सोहळाकाटोल : श्रीक्षेत्र पारडसिंगा येथे सोमवारी (दि. ९) आयोजित सर्वधर्म सामूहिक विवाह सोहळ्यात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त काटोल व नरखेड तालुक्यातील २३ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना थोर समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांच्या हस्ते प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचे वाटप केले जाणार आहे. वसंतराव देशमुख प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी अक्षयतृतीयेच्या पर्वावर श्रीक्षेत्र पारडसिंगा येथे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदाचे हे १४ वे वर्ष आहे. सर्वधर्मीय विवाह सोहळा व माजी मंत्री अनिल देशमुख यांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्याने काटोल व नरखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन पैसे गोळा केले. जमा झालेली रक्कम कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या २३ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. काटोल व नरखेड तालुक्यातील २३ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना रोख १५ हजारांची आर्थिक मदत शंकरबाबा यांच्या हस्ते शेतकरी कुटुंबांना दिली जाणार आहे. शंकरबाबा पापळकर हे स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद, बेवारस, अनाथाश्रमात १२३ अंध, अपंग, अनाथ मुलामुलींचे परतवाडा जवळील वज्झर फाटा येथील अनाथालयात संगोपन करीत आहेत. या सोहळ्याला शंकरबाबांची विशेष उपस्थिती असणार आहे. या सामूहिक विवाह सोहळ्यात अधिकाधिक संख्येत जोडप्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी मंत्री अनिल देशमुख, विखे गुरुजी, दिनकर राऊत, चंद्रशेखर मानकर, दीपक मोहिते, अजय लाडसे, अनुप खराडे, सावरकर आदींनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)