शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

उष्म्याने होतो विजांचा कडकडाट

By admin | Updated: June 17, 2015 02:54 IST

पावसाळ्यात वीज म्हटले की कुणालाही धडकी भरते. तिचा कडकडाट होताच प्रत्येक जण स्तब्ध होतो. विजांच्या या

नागपूर : पावसाळ्यात वीज म्हटले की कुणालाही धडकी भरते. तिचा कडकडाट होताच प्रत्येक जण स्तब्ध होतो. विजांच्या या कडकडाटालाच शास्त्रीय भाषेत ‘थंडरस्टॉर्म’ म्हटल्या जाते. तज्ज्ञांच्या मते, विदर्भासह मध्य भारतात वातावरणीय अस्थिरता, अति उष्णता व आर्द्रता अधिक असल्याने येथे ‘थंडरस्टॉर्म’ची वारंवारता सर्वाधिक असते. शिवाय यामुळे उपराजधानीसह आसपासच्या परिसरात विजांचा अधिक कडकडाट होत असून, अनेकांच्या अंगावर ती पडून त्यात त्यांचा बळी जात आहे. साधारणत: जून व जुलै महिन्यात ‘थंडरस्टॉर्म’ची वारंवारता सर्वाधिक असते. त्यामुळेच या दोन्ही महिन्यात विजांचा कडकडाट अधिक होतो. मात्र असे असले तरी विजांचा कडकडाट ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. शिवाय वातावरणातील संतुलनासाठी ती अत्यावश्यक असल्याचे सांगितल्या जाते. अशाप्रकारे जगभरात एका वर्षात सुमारे ३ ते ६ हजार ‘थंडरस्टॉर्म’ सक्रिय होतात. पृथ्वी व वातावरणात पॉझिटिव्ह व निगेटिव्ह अशा दोन प्रकारची ऊर्जा तयार होते. यातून विजेचा कडकडाट होतो. वातावरणातील निगेटिव्ह ऊर्जेचा पृथ्वीवरील पॉर्इंट कंडक्टरशी जेथे संबंध येतो, तेथे वीज पडण्याची अधिक संभावना असते. त्यामुळे अशा स्थळांना शास्त्रीय भाषेत ‘पॉर्इंट कंडक्टर’असे म्हटल्या जाते. वातावरणीय अस्थिरता, अधिक उष्णता व आर्द्रतेमुळे वातावरणात ‘थंडरस्टॉर्म’सह इलेक्ट्रिक फिल्ड तयार होते. नागपुरातील ‘थंडरस्टॉर्म’ची वारंवारता लक्षात घेता, जानेवारी महिन्यात १.३, फेब्रुवारी १.८, मार्चमध्ये २.६, एप्रिल ४.०, मे ६.४, जून १०.३, जुलै ९.०, आॅगस्ट ७.४, सप्टेंबर ८.२, आॅक्टोबर ३.२, नोव्हेंबर ०.७ व डिसेंबर महिन्यात ०.२ एवढी असते. यावरू न जून, जुलै व आॅगस्ट या तीन महिन्यात ‘थंडरस्टॉर्म’ची सर्वांधिक वारंवारता राहत असल्याने विजांचा कडकडाट अधिक होतो. ‘थंडर्सस्टॉर्म’ धोकादायक विजांचा कडकडाट ही नैसर्गिक प्रक्रिया असून, ती वातावरणाच्या संतुलनासाठी आवश्यक आहे. मात्र तेवढेच ते घातकही आहे. ‘थंडर्सस्टॉर्म’चे ढग साधारण जमिनीपासून १८ किलोमीटर उंच असतात. विमानासाठी ते अधिक धोकादायक असतात. त्यामुळे या ढगांमधून कधीही विमान जात नाही. तसेच एटीसीतर्फे पायलटला ‘थंडर्सस्टॉर्म’विषयी वेळोवेळी माहिती दिल्या जाते. पृथ्वीवर ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक फिल्ड तयार होते, तेथे वीज पडण्याची शक्यता असते. विशेषत: मान्सूनच्या सुरुवातीला अशाप्रकारच्या ‘थंडरस्टॉर्म’ ची वारंवारता अधिक राहत असल्याने विजांचा कडकडाट अधिक होतो. - ए.व्ही. गोडे, सहा. हवामान तज्ज्ञ