शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

१२९ ग्रा.पं.चे कारभारी आज ठणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:09 IST

नागपूर : जानेवारी महिन्यात निवडणुका झालेल्या जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आणि उपसरपंच पदासाठी गुरुवारी (दि. ११) निवडणूक होत आहे. ...

नागपूर : जानेवारी महिन्यात निवडणुका झालेल्या जिल्ह्यातील १२९ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आणि उपसरपंच पदासाठी गुरुवारी (दि. ११) निवडणूक होत आहे. त्यामुळे गावागावात बुधवारी राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला होता. सरपंचपदी वर्णी लागावी यासाठी इच्छुकांची जिल्हा पातळीवर नेत्याकडे गर्दी दिसून आली. सरपंच आणि उपसरपंच पदासाठी संबंधित ग्रा.पं.मध्ये सकाळी १० ते १२ पर्यंत उमेदवारी नामांकनाची प्रक्रिया होईल. यानंतर अर्जाची छाननी होईल. दुपारी २ वाजेपर्यंत उमेदवारी अर्जही मागे घेता येतील. दुपारी २ वाजतानंतर ग्रा.पं.ची विशेष सभा होईल. तीत सरपंच आणि उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल.

ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सरपंच आरक्षण सोडतीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. जिल्ह्यात १ ते ४ फेब्रुवारीदरम्यान १३ ही तालुक्यात आरक्षण सोडत काढण्यात आली. यात १५ जानेवारीला निवडणुका झालेल्या पाच गावात नव्या आरक्षणानुसार निवडून आलेला एकही सदस्य नसल्याने सरपंच पदाचा पेच निर्माण झाला आहे. यात रामटेक तालुक्यातील दाहोदा, सावनेर तालुक्यातील नांदोर, जैतपूर आणि सोनपूर तर कळमेश्वर तालुक्यातील सावंगी तोमर या ग्रा.पं.चा समावेश आहे.

लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या जिल्ह्यातील १३० ग्रामपंचायतींच्या निवडणुका आयोगाने डिसेंबर महिन्यात जाहीर केल्या. मतदार यादीतील घोळामुळे कुही तालुक्यातील देवळी (कला) ग्रा.पं.ची निवडणूक रद्द करण्यात आली. जिल्ह्यात १२९ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारी रोजी झाली. यात सावनेर तालुक्यातील जटामखोरा तर कळमेश्वर तालुक्यातील सोनपूर (आदासा) ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध झाली. या १२९ ग्रा.पं.मध्ये विविध वॉर्डातून ११७४ सदस्य विजयी झाले. यात ६६९ महिला सदस्यांचा समावेश आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीने १०२ ग्रा.पं.वर तर भाजपाने ७३ ग्रा.पं.वर दावा सांगितला आहे. त्यामुळे सरपंच आरक्षण सोडतीकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. जिल्ह्यात १२९ ग्रा.पं.मध्ये ११ फेब्रुवारी रोजी सरपंच पदासाठी निवडणूक होईल. यात कुणाचे किती सरपंच विजयी होतात, हेही स्पष्ट होईल. नव्या आरक्षण सोडतीनुसार ज्या गावात सरपंच पदासाठी उमेदवार नसेल तिथे उपसरपंचाकडे सरपंच पदाचा प्रभार सोपविण्यात येईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यानंतर येथील प्रशासकपद संपुष्टात येईल.

या गावामध्ये पेच

- कळमेश्वर तालुक्यात पाच ग्रा.पं.ची निवडणूक झाली. यात सोनपूर (आदासा) ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध झाली. सावंगी (तोमर) येथे अनुसूचित जमाती(महिला) साठी सरपंचपद आरक्षित असले तरी, निवडून आलेल्या नऊ सदस्यात या प्रवर्गाचा उमेदवारच नाही. यामुळे येथे उपसरपंच पदासाठी घोडेबाजार होणार आहे.

- सावनेर तालुक्यात १२ ग्रा.पं.साठी निवडणुका झाल्या. यात जटामखोरा ग्रा.पं.ची निवडणूक बिनविरोध झाली आहे. मात्र नव्या आरक्षण सोडतीनुसार नांदोरी ग्रामपंचायतचे सरपंचपद अनुसूचित जमाती, जैतपूर ग्रामपंचायत अनुसूचित जाती आणि सोनपूर ग्रामपंचायत अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे. या तिन्ही ग्रामपंचायतींमध्ये उपरोक्त आरक्षणाचा एकही सदस्य नाही.

- रामटेक तालुक्यात नऊ ग्रा.पं.च्या निवडणुका झाल्या. यात दाहोदा ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदासाठी आरक्षण अनु.जाती महिलासाठी निश्चित करण्यात आले. पण या ग्रामपंचायतमध्ये अनु.जाती महिला संवर्गातील जागा कोणत्याही वॉर्डात राखीव नव्हती. यासोबतच निवडणुकीत अनु.जाती महिला संवर्गातील उमेदवार एकाही वॉर्डातून निवडून आलेला नाही. त्यामुळे दाहोदा गावाला काही काळासाठी सरपंच पदासाठी वाट पाहावी लागेल.

यांचे सरपंचपद पक्के

- नरखेड तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या जलालखेडा ग्रा.पं.मध्ये सत्ताधारी जलालखेडा सुधार समितीला मतदारांनी नाकारले आहे. सुधार समितीला चार तर जनक्रांती पॅनलला नऊ जागा मिळाल्या आहेत. मात्र आरक्षण सोडतीनुसार येथील सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. यात १३ सदस्यांपैकी केवळ जलालखेडा सुधार समितीचे कैलास जगन निकोसे उपरोक्त संवर्गातील एकमेव सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्या पॅनलला बहुमत नसले तरी सरपंचपद नक्कीच मिळणार आहे.

- कामठी तालुक्यातील खेडी-पांढुर्णा-पांढरकवडा गट ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे ११ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक २ मधून विजयी झालेल्या भारती देवगडे यांची बिनविरोध वर्णी लागणार आहे. खेडी गट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १ मधून अनुसूचित जमाती(महिला)करिता राखीव असलेल्या जागेवर भारती गिरधर देवगडे विजय झाल्या; तर वॉर्ड क्रमांक २ मधून त्यांचे पती गिरीधर नारायण देवगडे हे विजयी झाले आहेत. संबंधित प्रवर्गातून भारती देवगडे या एकमेव सदस्य विजयी झाल्या आहेत.

निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती - १२९

निवडून आलेले सदस्य : ११७४