शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

हवालाची लुटालुट, पुन्हा एकदा बोभाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:08 IST

नरेश डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - कोरोनामुळे बहुतांश उद्योग व्यवसाय बंद पडण्याच्या स्थितीत आल्याने आणि अनेकांची आर्थिक ...

नरेश डोंगरे ।

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - कोरोनामुळे बहुतांश उद्योग व्यवसाय बंद पडण्याच्या स्थितीत आल्याने आणि अनेकांची आर्थिक कोंडी झाल्याने काहीसा अडगळीत पडलेला हवाला व्यवसाय पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू झाला असून, रोज पुन्हा कोट्यवधींची हेरफेर हवाला व्यावसायिक करू लागले आहेत. शनिवारी चिंतेश्वर मंदीराजवळ लुटण्यात आलेल्या २१ लाखांच्या रकमेनंतर पुन्हा एकदा हवाला चर्चेत आला आहे. त्यामुळे तपास यंत्रणांचाही लक्षवेध झाला आहे.

कधी ट्रेन, कधी ट्रॅव्हल्स कधी कार तर कधी दुचाकीने हवालाची रोकड ईकडे तिकडे करणारे व्यावसायिक पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकण्यासाठी नवनवीन फंडे वापरतात. कुरियर कंपन्या कधी पुस्तकात, कधी मिठाईच्या डब्यात तर कधी वेगवेगळ्या बॉक्समध्ये हवालाची रोकड पाठवतात. या गोरखधंद्याशी संबंधित असलेल्या टिपरकडून अधूनमधून त्यांचा भंडाफोड होतो आणि हवाला पुन्हा चर्चेत येतो. शनिवारी दुपारी चाकूच्या धाकावर तीन लुटारूंनी २१ लाखांची रोकड अन् अॅक्टीव्हा हिसकावून नेल्याने पुन्हा एकदा हवाला चर्चेत आला आहे.

देशाचा मध्यबिंदू असलेले नागपूर हवालाचेही केंद्रस्थान आहे. येथून काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि चांद्यापासून तो बांद्यापर्यंत हवालाची रक्कम बिनबोभाट पोहचवली जाते. छोटे-मोठे शंभरावर हवाला व्यावसायिक नागपुरात सक्रिय आहेत. त्यांच्याशी संबंधित एखाद दुसऱ्यांदा रोकड पकडली गेली किंवा लुटली गेली की काही वेळेसाठी बोभाटा होतो आणि नंतर त्या प्रकरणाचे काय झाले, हे कळायलाही मार्ग नसतो.

---

पोलिसांनीच लुटले होते अडीच कोटी

नागपुरात हवालाची रोकड लुटण्याच्या आणि पकडल्या जाण्याच्या गेल्या १० वर्षांत डझनभर घटना घडल्या. त्यातील सर्वात मोठी घटना २९ एप्रिल २०१८ ला घडली होती. रायपुरहून नागपूरला एका डस्टर कारमधून कोट्यवधींची रोकड येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नंदनवन पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक सोनोने याने आपल्या दोन कर्मचारी तसेच दोन कुख्यात गुंडांना हाताशी धरून हवालाच्या ५ कोटी, ७३ लाखांपैकी २ कोटी, ५५ लाखांची रोकड लुटली होती. लुटालुटीसोबतच हवालाची रक्कम पकडल्या जाण्याच्या अलिकडे गोंदिया, अमरावती येथेही घडल्या. एवढेच नव्हे तर उत्तरप्रदेशातील बच्चा बाबू गँगने बेछूट गोळीबार करून लखोटीया बंधूंची हत्या केली होती. त्या घटनेमुळे हवालाचे नागपूर कनेक्शन पहिल्यांदा उघड झाले होते.

-------

काळापैशाचा व्यवहार

हा संपूर्ण व्यवहार काळ्या धनाचा (ब्लॅक मनी) आहे. कच्चे की पत्ती (नंबर दोनची रोकड) म्हणून आणि असेच काहीसे कोडवर्ड वापरून हा व्यवहार केला जातो.

आधी दहशतवादी हवालामार्फत पैशाचा व्यवहार करायचे. नंतर अंडरवर्ल्ड, गुंड, खंडणीबाज हवाला करीत होते. आता काळ्याबाजारीत गुंतलेले मोठमोठे व्यावसायिक, अवैध धंदे करणारी मंडळी हवालाच्या माध्यमातून लेण-देण चे व्यवहार करतात.

--------

असे ठरते कमिशन

नागपुरातून आजुबाजुच्या छोट्या शहरात रोकड पोहचवायची असेल तर एक लाख रुपयांमागे २०० ते ३०० रुपये कमिशन घेतले जाते. मात्र, हीच रक्कम, मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता अथवा अन्य दुसऱ्या मोठ्या शहरात पोहचवायची असेल तर कमिशन ३०० ते ५०० रुपये ठरते. संबंधित सूत्रांनुसार नागपुरातून रोज २० ते २५ कोटींचा हवाला होतो.

-------

व्यंकटेश उर्फ गोलू कोहाड (वय २२) असे त्याचे नाव असून, तो पाचपावलीच्या नाईक तलाव परिसरात राहतो. बारापात्रे आणि कृष्णा नामक साथीदारांच्या मदतीने त्याने ही लुटमार केल्याचे समजते. हे तिघेही गुन्हेगारीत सक्रीय आहेत. मात्र, ते हवाला व्यावसाियकाच्या संपर्कात कसे आले, ते स्पष्ट झाले नाही.

या तिघांंना टीप देऊन रक्कम लुटण्यात आली असावी, असा संशय आहे. आरोपी कोहाडचा ३० सप्टेंबरपर्यंत पोलिसांनी पीसीआर मिळवला आहे. कोहाडच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

----