शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

हर्षच्या मृत्यूची चौकशी सुरू

By admin | Updated: August 25, 2015 03:51 IST

खुल्या वायरचा करंट लागल्यामुळे मृत झालेल्या हर्ष दीपक ललके (वय १३) या बालकाच्या मृत्यूला नेमका कुणाचा

नागपूर : खुल्या वायरचा करंट लागल्यामुळे मृत झालेल्या हर्ष दीपक ललके (वय १३) या बालकाच्या मृत्यूला नेमका कुणाचा हलजर्गीपणा कारणीभूत आहे, त्याची चौकशी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सीताबर्डी पोलिसांनी सोमवारी संबंधित अधिकारी तसेच विद्युत निरीक्षकांना बोलवून घटनास्थळाची तसेच आजूबाजूच्या भागाची तपासणी करून घेतली. रामदासपेठेतील सिम्स हॉस्पिटलमागे राहाणारा हर्ष रविवारी सकाळी मित्रांसोबत लेंड्रापार्क जवळच्या कॉर्पोेरेशन शाळेच्या आवारात खेळत होता. खेळताना थकल्यामुळे तो शाळेच्या चॅनल गेटजवळच्या ओट्यावर बसला. तेथे पडलेल्या वायरला त्याचा हात लागल्याने त्याला जोरदार करंट लागून त्याचा करुण अंत झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या भावना संतप्त असून, हर्षच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आहे. हर्षच्या मृत्यू प्रकरणात कोण दोषी आहे, त्याची चौकशी सीताबर्डी पोलीस करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, पीएसआय पुरी यांनी सोमवारी सकाळी वीज मंडळाचे निरीक्षक, महापालिकेतील वीज विभागाचे अधिकारी आणि महापालिकेच्या रामदासपेठ भागातील अधिकाऱ्यांना सोबत घेत घटनास्थळाचा पंचनामा करून वायरिंगची तपासणी करून घेतली. कुठून वीज प्रवाहीत झाली. वायर किती दिवसांपासून तुटून होती, आणखी असाच काही गैरप्रकार आहे का, त्याची जबाबदारी कुणावर होती, त्याची माहितीही जाणून घेतली.(प्रतिनिधी)आर्थिक मदत मिळावी४हर्षच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. त्याची आई वैशालीची प्रकृती अस्वस्थ आहे. दिलीप आणि वैशालीचा एकुलता एक मुलगा हर्ष कायमचा निघून गेल्यामुळे या दोघांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांना आणि शेजाऱ्यांनाही तीव्र दु:ख झाले आहे. हर्षचे वडील दिलीप आॅटोचालक आहेत. मुलाला मोठा अधिकारी बनविण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र, हर्ष सोबत ललके कुटुंबीयांच्या स्वप्नांचीही राखरांगोळी झाली. महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच हर्षचा करुण अंत झाला, अशी सार्वत्रिक भावना असून, ललके कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी शोकसंतप्त नागरिकांची मागणी आहे.