शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

हरिनामाने गुंजले बोरगांव

By admin | Updated: September 4, 2014 00:54 IST

श्रावण मासानिमित्त बोरगांव येथील श्री मारुती देवस्थान ट्रस्ट येथे श्रीमद्भागवत कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. मागील ६५ वर्षांपासून वारकरी हरिनाम संकीर्तन सप्ताह मोठ्या थाटाने साजरा होत आहे.

श्रीमद्भागवत कथा महोत्सव : परिणय फुके यांच्या हस्ते पूजा नागपूर : श्रावण मासानिमित्त बोरगांव येथील श्री मारुती देवस्थान ट्रस्ट येथे श्रीमद्भागवत कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. मागील ६५ वर्षांपासून वारकरी हरिनाम संकीर्तन सप्ताह मोठ्या थाटाने साजरा होत आहे. या सप्ताहात काकडा, श्रीमद्भागवत कथा, हरिपाठ, हरिकीर्तन दररोजच्या कार्यक्रमाची रूपरेषा असून ह़भ़प़ नारायण महाराज शेंडे, देवी ज्ञानेशाची, ईश्वर महाराज उईके (आळंदी), ह़भ़प़ पांडुरंग महाराज बारापात्रे, नारायण महाराज पडोळे, संतोष महाराज निंबाळकर, संतोष महाराज ठाकरे व डॉ़ रविदास महाराज शिरसाट यांनी भागवत कथेचे वाचन केले. या वेळी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. गोपालकाल्याचे कीर्तन करून महाप्रसाद वितरित करण्यात आला. सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ़ परिणय फुके यांच्या हस्ते विधिवत पूजा अर्चना व आरती करून श्रीमद्भागवत कथा सप्ताहाची सुरुवात करण्यात आली़ या प्रसंगी डॉ़ परिणय फुके म्हणाले, अशा भागवत कार्यक्रमामुळे आज समाज हा एकजुटीने बांधला गेला आहे़ श्रीमद्भागवत सप्ताह कथाच्या माध्यमातून प्रत्यक्षात परमेश्वराचे दर्शन घडत असते़ या वेळी नितीन महाराज वानखेडे, राधेश्याम महाराज साठवणे, ईश्वर महाराज उईके, बबलू महाराज उपासे, अमित करडभजने, निशिकांत टाकळखेडे, प्रमोद चौधरी, अनिल भुसारी, रवि कडू, आकाश ठाकरे, प्रभूजी बाविसताले, घनश्याम जैवार, ज्ञानेश्वर इंगोले, देवीदास ठाकरे, गोवर्धन सडभाके, नानाजी बधणे, राजू इंगोले, निवृत्ती चौधरी, बळवंतराव वानखेडे, भोजराज निंबाळकर, नामदेवराव मते, सुनील धांडे, वासुदेव महाराज, पंढरीजी साबळे, सोपान महाराज, ज्ञानेश्वर महाराज, श्रीराम गिरे, हिंमत बुवा, प्रभाकर भोयर, शंकरराव सपाटे, भाऊराव चोपडे, धनराज पाल, नारायण भांगे, रामकृष्णा गोधनीवाले, हनुमान वानखेडे, संभाजी मारबते, बालचंद्रजी शिंगणे परिवार, मोरुभाऊ बरडे परिवार, नामदेव काळे, मनोहरराव कडू, विजयराव बरडे, राजेंद्रजी दखणे, नितीनजी मोरे, कृष्णा फळके, नारायणराव उगले, रामदासजी इंगोले, कमलाकर चौधरी, शंकरराव सपाटे, प्रवीण ठाकरे, मोरेश्वर रहाटे, देवीदास तिवाडे, संभाजी मारबते, संजय चौधरी, सुधाकर आदमने, आनंदराव गोतमारे, सुरेश आदमने, शरद शिंगणे, ईश्वर काळे, धनराज पाल तसेच सेवाभावी भजन मंडळी वारकरी भजन मंडळ बोरगाव, माऊली महिला भजन मंडळ बोरगांव, हरिओम महिला भजन मंडळ हनुमान मंदिर टेकडी बोरगांव, साईबाबा महिला भजन मंडळ बोरगांव, शिव महिला भजन मंडळ बोरगांव, अनसूया महिला भजन मंडळ गोरेवाडा, एकता महिला भजन मंडळ बोरगाव, गजानन महिला भजन मंडळ, बोरगाव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)