शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

हाताला सलाईन लावून दिली परीक्षा

By admin | Updated: May 25, 2016 19:16 IST

आयुष्यात सृष्टीतील रंगांना स्थानच नसताना दु:खाला न कवटाळता लहान वयातच त्याने विद्येच्या प्रकाशाला जवळ केले.

योगेश पांडे

नागपूर, दि. 25- आयुष्यात सृष्टीतील रंगांना स्थानच नसताना दु:खाला न कवटाळता लहान वयातच त्याने विद्येच्या प्रकाशाला जवळ केले. अनेक अडचणींचा सामना करत बारावीच्या वर्षभरात अथक कष्ट घेऊन अभ्यास केला. परंतु संकटांनी अखेरपर्यंत पिच्छा सोडला नाही. परीक्षेच्या चार दिवस अगोदर आजारी पडल्यामुळे रुग्णालयातच दाखल व्हावे लागले. आता तो पेपर देऊच शकणार नाही असे सर्वांना वाटले. परंतु त्याने हिंमत दाखविली. थेट रुग्णवाहिकेने परीक्षा केंद्र गाठले अन् हाताला ह्यसलाईनह्ण असतानादेखील पूर्ण पेपर लिहिला. बुधवारी बारावीचा निकाल जाहीर झाला अन् खऱ्या अर्थाने त्याची जिद्द जिंकली. दृष्टीहिनांमधून त्याने शहरात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. हिस्लॉप महाविद्यालयातील विद्यार्थी अनिकेत बेंडे याचे यश हताश झालेल्या विद्यार्थ्यांना लढण्याची नवी प्रेरणा देणारे आहे.जन्मापासूनच पूर्णत: अंध असलेल्या अनिकेत दिनकर बेंडे याने कला शाखेत ८८.३० टक्के गुण मिळविले आहेत. दहावीत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाल्यानंतरदेखील अनिकेतने विज्ञान शाखेत प्रवेश न घेता कला शाखेची निवड केली. कारण त्याचे ध्येय आहे. त्याला भारतीय प्रशासकीय सेवेत जायचे आहे. वडील दिनकर बेंडे, आई मनीषा बेंडे व भाऊ अभिलाश बेंडे यांच्या प्रोत्साहनामुळे त्याने शिकवणीदेखील न लावण्याचा निर्णय घेतला व स्वत:च्या बळावरच बारावीचा अभ्यास सुरू केला. वर्षभर त्याने जीव लावून अभ्यास केला होता. १८ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होणार होती. परंतु १४ तारखेला अचानक अनिकेतची तब्येत खराब झाली व त्याला थेट रुग्णालयातच दाखल करावे लागले. अशा स्थितीत अनिकेतने पेपर देऊ नये असेच सल्ले त्याला अनेकांकडून देण्यात आले. तो पेपर देऊ शकेल की नाही याबाबत त्याचे कुटुंबीयदेखील साशंक होते. परंतु अनिकेतला या परीक्षेचे महत्त्व चांगल्याने माहीत होते. त्यामुळे त्याने परीक्षा देण्याचा निर्णय घेतला व घरच्यांनीदेखील त्याला मानसिक पाठबळ दिले. पहिल्या तीन पेपरसाठी कुठलाही अभ्यास न करता अनिकेत चक्क रुग्णवाहिकेतून परीक्षा केंद्रावर गेला. हाताला ह्यसलाईनह्ण असतानादेखील त्याने पूर्ण पेपर लिहिला. वर्षभर मन लावून अभ्यास केल्यामुळे त्याला पेपर लिहिताना फारशी अडचण गेली नाही. अनिकेतला व्हायचेय प्रशासकीय अधिकारीपरीक्षेच्या ऐन वेळेवर आजारी पडल्यामुळे मला दडपण आले होते. परंतु काहीही करून मला पेपर द्यायचेच होते. मला यश मिळाल्याचे समाधान आहे. मला आता दिल्ली किंवा पुण्यातून कला शाखेत पदवी प्राप्त करायची आहे आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची आहे. मला माझ्या कुटुंबीयांकडून फार प्रोत्साहन मिळाले व त्यांच्यामुळेच मी जिद्द दाखवू शकलो, अशा भावना अनिकेतने व्यक्त केल्या. अनिकेतला संगीताचा छंद असून तो स्वत: विविध ह्यकम्पोझिशन्सह्ण तयारदेखील करतो. बारावीच्या वर्षातदेखील त्याने छंदाला स्वत:पासून वेगळे होऊ दिले नव्हते हे विशेष.