शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

गाईड राेलर चाेरटे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : कन्व्हेअर प्लांटमधील गाईड राेलर चाेरून नेणाऱ्या सहा चाेरट्यांसह ते विकत घेणाऱ्या दाेन कबाडी दुकानदारांना ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापरखेडा : कन्व्हेअर प्लांटमधील गाईड राेलर चाेरून नेणाऱ्या सहा चाेरट्यांसह ते विकत घेणाऱ्या दाेन कबाडी दुकानदारांना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलिसांनी रविवारी (दि. १२) अटक केली. त्यांच्याकडून एकूण २५ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती ठाणेदार पुंडलिक भटकर यांनी दिली.

अटक करण्यात आलेल्या चाेरट्यांमध्ये लक्ष्मीनारायण ऊर्फ मुच्छी गरीबा सूर्यवंशी (३६), राजा शंकर सूर्यवंशी (२४), सहेबान ऊर्फ राजू सुकरुल्ला सलमानी (३४), शुभम रमेश वरणकर (२४) सर्व रा. चनकापूर, ता. सावनेर, श्यामलाल धुरणलाल भलावी (३५, रा. दहेगाव रंगारी, ता. सावनेर), कृष्णा ऊर्फ कन्हय्यालाल सूर्यवंशी (२५, रा. सिल्लेवाडा, ता. सावनेर) या चाेरट्यांसह दाेन कबाडी व्यावसायिकांचा समावेश आहे. त्यांची नावे कळू शकली नाही.

खापरखेडा येथे कन्व्हेअर प्लांट सुरू करण्यासाठी येथील स्टाेअर रूममध्ये वेगवेगळ्या आकाराचे कन्व्हेअर गाईड राेलर ठेवले आहेत. चाेरट्याने या स्टाेअर रूममधून दाेन वेगवेगळ्या आकाराचे १२८ नग कन्व्हेअर गाईड राेलर चाेरून नेले. ही बाब लक्षात येताच प्रशांतकुमार बेहरा, रा. भुवनेश्वर, ओडिशा यांनी बुधवारी (दि. ८) पाेलिसात तक्रार दाखल केली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी भादंवि ४६१, ३८० अन्वये गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.

ही चाेरी लक्ष्मीनारायणने केल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी त्याला रविवारी चनकापूर परिसरातून ताब्यात घेत विचारपूस केली. त्याने गुन्ह्याची माहिती देत साथीदार व कबाडी दुकानदारांची नावे सांगितली. त्यामुळे पाेलिसांनी सर्वांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून २१ लाख ९० हजार रुपये किमतीचे १०७ नग कन्व्हेअर गाईड राेलर व ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे छाेटे मालवाहू वाहन असा एकूण २५ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार पुंडलिक भटकर यांनी दिली. ही कारवाई पाेलीस हवालदार उमेश ठाकरे, आशिष भुरे, प्रमाेद भाेयर, नुमान शेख, राजू भाेयर, मुकेश वाघाडे यांच्या पथकाने केली.

...

१२८ कन्व्हेअर गाईड राेलरची चाेरी

या चाेरट्यांनी स्टाेअर रूममधून दाेन वेगवेगळ्या आकाराचे एकूण १२८ नग कन्व्हेअर गाईड राेलर चाेरून नेले. त्या कन्व्हेअर गाईड राेलरची एकूण किंमत २६ लाख ४० हजार रुपये आहे. पाेलिसांनी यातील १०७ नग जप्त केले. चाेरट्यांनी स्टाेअर रूमच्या छताचे टिनपत्रे उचकटून आत प्रवेश केला हाेता. हे गाईड राेलर नेण्यासाठी त्यांनी एमएच-४९/डी-१८२९ क्रमांकाचे मालवाहू वाहन वापरले हाेते. त्यांच्याकडून चाेरीच्या इतर घटना उघड हाेण्याची शक्यता ठाणेदार पुंडलिक भटकर यांनी व्यक्त केली आहे.