शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांच्या मुलांचे पालकत्व स्वीकारणार

By admin | Updated: July 13, 2016 03:28 IST

कैद्यांच्या मुलांना शिकविण्यासाठी, त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांचे पालकत्व स्वीकारण्याची कल्पना आहे.

पुण्यातून प्रयोगाची सुरुवात : कारागृह महानिरीक्षक डॉ. उपाध्याय यांची कल्पना नागपूर : कैद्यांच्या मुलांना शिकविण्यासाठी, त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांचे पालकत्व स्वीकारण्याची कल्पना आहे. यासाठी सार्वजनिक, स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर १४ जुलैला पुण्यात आदर्श गणेश मंडळ आणि भोई प्रतिष्ठानाच्या पुढाकाराने कारागृह प्रशासन कैद्यांच्या २०० मुलांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करणार आहे. सिम्बॉयसिसचे संस्थापक पद्मभूषण शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात होणार असल्याची माहिती कारागृह महानिरीक्षक, अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. राज्यातील कारागृहांमध्ये इस्रायलच्या धर्तीवर सुरक्षा व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूरच्या कारागृहात इस्रायलच्या सुरक्षा अधिकाऱ्यांचे पाच सदस्यीय पथक सोमवारपासून आहे. त्यांच्यासोबतच डॉ. उपाध्यायही येथे आले होते. निवडक पत्रकारांनी त्यांच्याशी मंगळवारी सायंकाळी चर्चा केली. यावेळी त्यांनी उपरोक्त माहिती दिली. राज्यातील कारागृहात २९ हजार कैदी बंदिस्त आहेत. अनेक जण २० ते २५ वर्षांपासून शिक्षा भोगत असल्याने त्यांच्या पाल्यांची अवस्था वाईट आहे. त्यांनी गुन्हेगारीकडे वळू नये, शिकून चांगले नागरिक व्हावे, या हेतूने त्यांना शिक्षणासाठी मदत करण्याची कल्पना होती. या कल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी कैद्यांच्या मुलांचे पालकत्व स्वीकारण्याचा विचार पुढे आला. पुण्यातील आदर्श गणेश मंडळ आणि भोई प्रतिष्ठानने यासाठी मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे कैद्यांच्या २०० मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यापासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. पुण्यात १४ जुलैला त्याअनुषंगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पद्मभूषण शां. ब. मुजुमदार या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा उपक्रम पुण्यात यशस्वी झाल्यानंतर राज्यभरातील कैद्यांच्या मुलांसाठी तो राबविला जाणार असल्याचे डॉ. उपाध्याय यांनी सांगितले. पुढचा टप्प्यात कैद्यांंच्या मुलांशी ‘थेट भेट’ हा असेल. कैद्यासोबत त्याचा मुलगा किंवा मुलगी कारागृहात थेट ४० मिनिटे राहू शकेल. कैद्याला त्याच्या मुलांचे आणि मुलांना त्यांच्या वडिलांचे (कैदी महिला असेल तर आईचे) प्रेम मिळावे आणि त्यांच्या वर्तनात, विचारात सुधारणा व्हावी, हा या थेट भेटीमागचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)